Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेसयशकथा

साधा किराणा दुकानाचा मालक ते होघाऊक पुरवठादार – एक संघर्षमय प्रवास

फिनिक्स भरारी! – संदीप पोंडे, परभणी

मराठवाड्यातील परभणीमधील संदीप पोंडे हे छोटेखानी जनरल स्टोअर चालवत होते. या दुकानातून मिळणारं उत्पन्न त्यांच्या सहा जणांच्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी अत्यंत तुटपुंजं होतं. या दुकानाला पूरक असा आणखी एखादा व्यवसाय करायचं त्यांच्या मनात होतं; पण धाडस होत नव्हतं. पण ते शक्य झालं, महामंडळाच्या सहकार्यामुळे.

जिद्द, चिकाटी, मेहनत करायची तयारी असेल तर सर्व काही मिळतं, असं म्हटलं जातं, पण तरीही कधी-कधी पदरी निराशाच पडते. कारण स्वत: काहीतरी वेगळं करण्याची ज्यावेळी आपण हिंमत करतो, त्यावेळी अपुर्‍या भांडवलामुळे आपण काहीच करू शकत नाही. हा माझा यापूर्वीचा अनुभव आहे. विचार करत असताना प्रश्न पडतात, प्रश्नाचे उत्तर मिळत नाही. आणि मग तरीही त्यातून मार्ग कसा काढायचा हे जेव्हा आपण शोधत असतो तेव्हा कुणीतरी आपल्या मदतीला धावून येतं आणि आपली परिस्थिती बदलण्यासाठी मदत करतं. मी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचा शतशः ऋणी आहे की, त्यांनी माझी जिद्द ओळखून मला हातभार दिला, जगण्याचा नवा मार्ग दिला, माझा व्यवसाय वाढवण्यास सहकार्य केलं त्याबद्दल मी वारंवार त्यांच्या ऋणात राहू इच्छितो. हे बोल आहेत परभणी येथील रहिवासी संदीप पोंढे यांचे.

संदीप यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले; पण ते डगमगले नाहीत. आयुष्यात आपल्यालाही एक संधी मिळेल, या आशेवर ते कष्ट व प्रयत्न करत होते. संदीप हे परभणीमधील रहिवासी आहेत. त्यांचा आधी जनरल स्टोअर्सचा व्यवसाय होता. तो व्यवसाय कधी कधी तोट्यात जायचा. म्हणजे फायदा अतिशय तुटपुंजा मिळत होता, त्यातून आई-वडील, बायको, दोन मुले आणि स्वतः यांचा खर्च सुद्धा भागत नव्हता. या परिस्थितीमुळे आपल्याला दुसरा काहीतरी व्यवसाय केल्याशिवाय पर्याय नाही, याची त्यांना नेहमी जाणीव होत होती. असंच एकदा विचार करत असताना अनेक कल्पना डोक्यात येत होत्या; पण त्या कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी भांडवलाची कमतरता होती .

एक दिवस मात्र त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा उजाडला. वर्तमानपत्र वाचत असताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची जाहिरात वाचली. काहीच न करण्यापेक्षा किंवा आहे त्या परिस्थितीत जगण्यापेक्षा वेगळ्या व्यवसायाच्या उभारणीचा प्रयत्न करायला काय हरकत आहे, आपण अर्ज केला आणि कर्ज मिळवण्याचा प्रयत्न केला तर … असा त्यांनी विचार केला. त्यानंतर कागदपत्रांची जमवाजमव केली आणि कॅनरा बँकेच्या परभणी शाखेमध्ये कर्जासाठी अर्ज केला. ते सांगतात, इतर सर्व कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर घरी आलो. आठ दिवस विचार करत राहिलो की आपल्याला कर्ज मंजूर होईल की नाही… पण दहा ते पंधरा दिवसांमध्येच बँकेतून फोन आला की, तुमचे नऊ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झालेले आहे. तुम्ही आम्हाला येऊन भेटा. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. मी तत्काळ बँकेशी संपर्क केला आणि कर्ज मिळाल्याची खात्री करून घेतली.

या मिळालेल्या रकमेतूनच त्यांनी स्वतःचा किराणा माल होलसेलरचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये जनरल स्टोअर्सबरोबरच वेफर्स, चिप्स, कोल्हापूर चना, मूगदाळ, तेल अशा संबंधित सर्व वस्तूही त्यांनी होलसेल दरात छोट्या मोठ्या दुकानदारांना घरपोच विकायला सुरुवात केली. यातून मिळालेल्या नफ्यातून त्यांनी स्वतः चं चारचाकी वाहन (छोटा हत्ती) खरेदी केलं आहे. तसंच त्यांच्या जनरल स्टोअरवर एक मुलगा कामासाठी ठेवला आहे आणि एक मुलगा त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गाडीवर असतो. अशा दोन माणसांना आज दीपक यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

सुरुवातीला त्यांना 15 हजार रुपयांचं उत्पन्न मिळत होतं. आज त्यात वाढ होऊन तीस ते चाळीस हजार रुपयांच्या वर उत्पन्न मिळायला लागलं आहे, याबरोबरच कर्जाचा व्याज परतावा सुद्धा प्रत्येक महिन्याला मिळत आहे. यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील यांचे ते मनःपूर्वक आभार मानतात. ते सांगतात, माझ्यासारख्या नवउद्योजकांना, नवतरुणांना एक नवी प्रेरणा देण्याचं काम, एवढंच नाही तर त्यांच्या जगण्याला बळ देण्याचं काम, त्यांच्या पंखाना आकाशामध्ये भरारी देण्याचं काम हे महामंडळ करत आहे. यासाठी मानावे तेवढे आभार कमीच आहेत. आज घडीला मी एक छोटा मोठा का होईना उद्योजक म्हणून नावारुपाला येतोय आणि समाजात ताठ मानेने उद्योजक म्हणून जगतोय ते फक्त महामंडळाच्या मदतीमुळेच…!

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माननीय नरेंद्र पाटील यांचे मनःपूर्वक आभार. माझ्यासारख्या नवउद्योजकांना, नवतरुणांना एक नवी प्रेरणा देण्याचं काम, एवढंच नाही तर त्यांच्या जगण्याला बळ देण्याचं काम, त्यांच्या पंखाना आकाशामध्ये भरारी देण्याचं काम हे महामंडळ करत आहे. फक्त आणि फक्त महामंडळामुळेच मी उद्योजक म्हणून पुढे येतो आहे.

  • संदीप पोंडे

(सभार-narendrapatilmathadi.com)

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close