Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

श्वसनासंबंधी २० आजारांसाठी मोफत उपचार, शुल्क आकारल्यास रुग्णालयाला पाचपट दंड

मुंबई | महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केला आहे. यामुळे आता श्वसनासंबंधित २० आजारांसाठी मोफत उपचार करण्यात येणार आहे.

श्वसनासंबंधित २० आजारांसाठी मोफत उपचार करण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

गणेशोत्सव आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक घेतली होती, त्यावेळी हा आदेश जारी करण्यात आला आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केले आहे. यात श्वसनासंबंधित २० आजारांसाठी मोफत उपचार, असा आदेश यावेळी जारी करण्यात आला आहे. असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतील रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहे. उपचारासाठी पैसे घेतले तर पाचपट दंड लावण्याचा, तसेच परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे, असेही राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

तसेच या बैठकीत सार्वजनिक गणपती, गणपती मिरवणूक याबाबतच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहे. यावेळी कोरोनाविरोधात लढा आणि अडचणी यावरही चर्चा झाल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close