Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजकारणाला रामराम,पत्नी संजना जाधव यांची राजकीय वारसदार म्हणून घोषणा

mh20live Network

औरंगाबाद : कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज अचानक राजकारणातून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या या घोषणेने राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी याबाबतचा एक व्हिडीओ संदेश जारी करुन त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीची घोषणा केली आहे. निवृत्तीची घोषणा करताना ते म्हणाले की, सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अनेकजण आपापले छंद जोपासत आहे. मी देखील माझ्या आध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. आता राजकारणातून निवृत्ती घ्यावी. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी ही माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्या सर्वांना जे काही प्रश्न असतील ते प्रश्न आपण संजनाकडून सोडवून घ्यावे, अशी मी विनंती करतो. प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. आमच्याही घरात झाल्या. पण त्यामुळे काही वेगळ्या गोष्टी घडत असतील, असा त्याचा अर्थ नाही. मी संजना जाधव यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. रायभान जाधव यांच्या आशीर्वादाने आणि केंद्रीय मंत्री राबसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली संजना निश्चतच उत्तुंग भरारी घेतील, याबाबत शंका नाही. आपण कृपया यापुढे राजकीय, सामाजिक किंवा शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी थेट संपर्क साधावा. ते सगळे फोन उचलतात’, असे हर्षवर्धन जाधव म्हणाले.

राजकारणातून निवृत्ती …

राजकारणातून निवृत्ती …माझी राजकीय वारसदार सौ संजना हर्षवर्धन जाधव

Harshwardhan Jadhav यांनी वर पोस्ट केले शनिवार, २३ मे, २०२०
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close