Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

शेतकऱ्यांनी ३१ जुलैच्या आत खरीप पीक विमा काढावा – जिल्हाधिकारी उदय चौधरी


औरंगाबाद /mh20live

पीक विमा भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असून विहीत मुदतीत शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा काढावा, असे आवाहन जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप पीक विमा बाबतच्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तुकाराम मोटे, एल डी एम श्री.करेगावकर, डी सी सी बँकेचे आर डी आहेर, बाळासाहेब जोशी, रामनाथ भिंगरे यांच्यासह संबंधित उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांनी कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभूमीवर पीक विमा भरण्यासाठी एकाच वेळी गर्दी करु नये. कटाक्षाने ३१ जूलै पूर्वी पीक विमा काढण्याची खबरदारी घ्यावी तसेच गर्दी टाळून भौतिक अंतर ठेऊन पीक विमा काढावा . त्या दृष्टीने संबंधित यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा विहीत मुदतीत भरावा, यासाठी योग्य जनजागृती करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी संबंधितांना निर्देश दिले.
आजपर्यंत सी एस सी केंद्रामार्फत ३५३२५१ अर्जदारांनी १४१८४२ हेक्टर तर बँके मार्फत ३०२९ अर्जदारांनी १८२६ हेक्टर असा एकूण ३५६२८० अर्जदारांनी १४३६६७ हेक्टर वर पीक विमा काढलेला आहे. यामध्ये अधिक शेतकरी सहभागी होण्यासाठी
बँकांनी पीक विमा स्वीकारण्याची गती वाढवावी . ज्या कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा काढायचा नाही त्यांच्याकडून लेखी घेऊन उर्वरित कर्जदार शेतकऱ्यांचा पीक विमा भरून घेण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजना व पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजनांचा आढावा घेण्यात आला. या दोन्ही योजनांबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.
सन २०२०२१, २०२१२२ व २०२२_२३ या तीन वर्षासाठी खरीप व रब्बी पिकांचे विमा प्रस्ताव स्वीकारणे साठी एच डी एफ सी एर्गो या विमा कंपनीची शासनाने निवड केलेली आहे. खरीप हंगामामध्ये खरीप ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, खरीप कांदा या पिकांचा अधिसूचित महसूल मंडळामध्ये पीक विमा स्वीकारला जाणार असल्याचे श्री.मोटे यांनी सांगितले.
यावेळी पीक विमा कंपनीने प्रचार प्रसिध्दी साठी तयार केलेल्या दोन रथाना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते झेंडा दाखवण्यात आला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close