Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

फोर्ड इंडियाकडून डोअरस्‍टेप सर्विस च्‍या माध्‍यमातून औरंगाबादच्‍या ग्राहकांना सुरक्षितता व सोयीसुविधांची खात्री

फोर्ड इंडियाकडून डोअरस्‍टेप सर्विस च्‍या माध्‍यमातून औरंगाबादच्‍या ग्राहकांना सुरक्षितता व सोयीसुविधांची खात्री

औरंगाबाद ,ग्राहकांसाठी सोयीसुविधा व सुरक्षिततेमध्‍ये अधिक वाढ करत फोर्ड इंडियाने डोअरस्‍टेप सर्विस  सुरू केली आहे. ही सर्विस मालकांना त्‍यांच्‍या इच्छित स्‍थळी – घरी किंवा कार्यालयाच्‍या ठिकाणी विना अतिरिक्‍त शुल्‍कामध्‍ये त्‍यांच्‍या फोर्ड वाहनांची सर्विसिंग करण्‍याची सुविधा देते.

ही नवीन ऑफरिंग फोर्डने डायल-ए-फोर्ड  अंतर्गत सादर केलेल्‍या ग्राहक-केंद्रित उपक्रमांचे विस्‍तारीकरण आहे, जेथे सर्व विक्री व सर्विससंबंधित चौकशीचे हेल्‍पलाइनच्‍या माध्‍यमातून निराकरण केले जाते.

पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये कंपनीने खालील शहरांमध्‍ये डोअरस्‍टेप सर्विस सुरू केली आहे:  प्रशिक्षित फोर्ड तज्ञांकडून देण्‍यात येणा-या डोअरस्‍टेप सर्विसमध्‍ये आवश्‍यक वाहन तपासणी, पार्ट रिप्‍लेसमेंट्स जसे फिल्‍टर्स, ऑईल रिप्‍लेसमेंट आणि ड्राय-वॉशिंगसह नियोजित सर्विसमध्‍ये असलेल्‍या इतर सर्व कृतींचा समावेश आहे.

ग्राहक सर्विसनंतर ऑनलाइन पेमेण्‍ट्स करू शकतात. त्‍याच ठिकाणी वाहनासंदर्भातील समस्‍येचे निराकरण होऊ शकत नसेल तर टेक्निकल टीम जवळच्‍या सर्विस सेंटरमध्‍ये वाहन घेऊन जाईल.

डोअरस्‍टेप सर्विस ग्राहकांना विना अतिरिक्‍त शुल्‍कासह ऑफर करण्‍यात आली आहे. 

कुटुंब हे नेहमीच गोष्‍टी सुलभ करण्‍यासाठी आणि तुम्‍हाला आनंद देण्‍याकरिता तुमची काळजी घेण्‍यासाठी असते. एका कुटुंबाप्रामणेच फोर्ड नेहमीच तुमची काळजी घेण्‍यासाठी तत्‍पर असते आणि डोअरस्‍टेप सर्विस हे आमच्‍या ग्राहकांना उत्तम सेवा देण्‍याप्रती असलेल्‍या आमच्‍या स्थिर कटिबद्धतेमधील आणखी एक पाऊल आहे,” असे फोर्ड इंडियाच्‍या मार्केटिंग, सेल्‍स व सर्विस विभागाचे कार्यकारी संचालक विनय रैना म्‍हणाले.

फोर्ड सातत्‍याने सर्विस प्राइस कॅल्‍क्‍युलेटर  सारख्‍या विविध नाविन्‍यपूर्ण व अद्वितीय उपक्रमांच्‍या माध्‍यमातून नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने सादर करत आली आहे. यामुळे ग्राहकांना डिलरशिपमध्‍ये येण्‍यापूर्वीच त्‍यांच्‍या कारची सर्विस व पार्टससाठी होणारा खर्च यांची माहिती मिळते.  

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close