Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

बाल शक्ती, बाल कल्याण पुरस्कारासाठी 15 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

औरंगाबाद,दि. 10 – केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर असून सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. बाल शक्ती पुरस्कार सन 2021 व बालकल्याण पुरस्कार 2021 करिता केंद्र शासनाने अर्ज मागविलेले आहेत. सदरचे अर्ज हे www.nca-wcd.nic.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. या पुरस्काराची माहिती वरील सकेतस्थावर देण्यात आलेली आहे. पुरस्कारासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2020 पर्यंत आहे, असे आवाहन उपआयुक्त (बाल विकास) महिला व बाल विकास आयफक्तालयामार्फत करण्यात आले आहे.

बाल शक्ती पुरस्कार

हा पुरस्कार ज्या मुलांनी (5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, संस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य इत्यादी क्षेत्रात नैपुण्यपूर्ण कामगिरी केलेली आहे. अशा मुलांना हा पुरस्कार देण्यात येतो.

बाल कल्याण पुरस्कार

1) वैयक्तीक पुरस्कार:- यामध्ये मुलांच्या विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतून किमान 7 वर्षे काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.

2) संस्था स्तरावर:- बालकल्याण क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पूर्णत: शासनाच्या निधीवर अवलंबून नसावी. बालकल्याण क्षेत्रात किमान 10 वर्षे सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.*******    

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close