Subscribe to our Newsletter
Loading
ब्लॉग्ज

एक गुलाब नात्यांसाठी…घेऊ सुखद प्रेमाची मजा

कोमल बाबासाहेब जाधव

फेब्रुवारी महिना सुरू झाला की अनेकांना चाहूल लागते ती प्रेम दिवसाची म्हणजेच व्हॅलेंटाईन ची. या आठवड्यात येणाऱ्या दिवसांची तसेच या आठवड्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा. कुणाला आठवडा, हे प्रेम दिवस वगैरे फालतू पणा वाटतो, तर कुणासाठी हा अगदी जिव्हाळ्याचा विषय. महाविद्यालयांमध्ये मात्र धुम असते या दिवसांमध्ये.आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला वेगवेगळ्या दिवशी आपली वेगळी भेटवस्तू देऊन त्या व्यक्तीसाठी हा आठवडा स्पेशल बनवला जातो. रोज डे प्रपोज डे चॉकलेट डे असे अनेक डे साजरे होतात.या दिवसांना विरोधही मात्र तितकाच होतो.

!वाचाः!…..जीवनात खरं प्रेम करा…..!!❤️*

ही पाश्चिमात्य संस्कृती आहे आपण आपल्या संस्कृतीनुसार राहायला हवं अशी वाक्य अनेकदा कानावर पडतात. मात्र, या प्रेम दिवसाला एका नव्या दृष्टिकोनातून बघायला हव. आपल्या धावपळीच्या जीवनामध्ये आपण एकमेकांना वेळ द्यायला विसरत आहोत.तंत्रज्ञानाने जितकी माणसे जवळ आणली तितकी दुरावली देखील संवाद कमी होत आहे .आणि वाद वाढत जात आहेत नात्यांमधील जिव्हाळा कुठेतरी विरून गेला आहे. आपण म्हणतो की 365 दिवस प्रेमाचे आहेत काय करायचा व्हॅलेंटाईन? मला सांगा तुम्ही कितीदा आपल्या आईला बहिणीला प्रेमाने फुल दिल आहे. कितीदा कडकडून मिठी मारली आहे. आपल्या आवडणाऱ्या व्यक्तीसाठी आवर्जून वेळ काढला आहे. त्यांना अचानक एक मस्त वाल सरप्राईज दिल आहे. आपल्या रोजच्या घाईगर्दीत आपण प्रेमाने बोलायला देखील विसरलो आहोत. एखादा सण-उत्सव आला की करतोच आपण साजरा तसेच व्हॅलेंटाईन का नको ? आणि हो हा व्हॅलेन्टाईन काही फक्त प्रेमीयुगुलांनासाठीच नसतो बरं का नात्यांना जीव लावणाऱ्या तुमच्या-माझ्या सगळ्यांसाठीच असतो.

आपल्या प्रिय जणांवर प्रेम करणार्‍या सगळ्यांसाठीच तो आहे.नात्यातल्या प्रेमळ धाग्याला घट्ट करणाऱ्या प्रत्येकासाठी आहे. आपल्या नात्यांना घट्ट मिठी मारायलाच हवी. मग काय करणार का साजरा हा येणारा व्हॅलेंटाईन?मारणार घट्ट मिठी आपल्या नात्यांना . आपल्या नात्यांना नव्या वळणावर नेण्यासाठी व्यक्त व्हायलाच हवं.

एक गुलाब तुझा , एक गुलाब माझा
सुगंधाचं लेऊ लेणं, अन दुःखाला देऊ रजा
एक गुलाब तुझा, एक गुलाब माझा
नात्यात नको दुरावा आता, घेऊ सुखद प्रेमाची मजा
एक गुलाब तुझा, एक गुलाब माझा

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

(
कोमल बाबासाहेब जाधव
-लेखिका शासकीय माध्यमिक आश्रमशाळा, रामपुर जि.नंदुरबार येथे कार्यरत आहेत )

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. MH20LIVE.COM याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक mh20liv[email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close