Flipkart
फ्लिपकार्ट होलसेलकडून सदस्यांसाठी समर कॅम्पेन ‘महामुनाफा उत्सव‘ लॉंच
● २० मे ते ३१ मे २०२२ पर्यंत सदस्य स्टेपल्स, डेअरी अॅण्ड फ्रेश, पर्सनल व होम केअर अशा अनेक विभागांमधील आकर्षक डिल्स व ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात
● महामुनाफा उत्सवचा त्यांच्या सदस्यांसाठी बचतींमध्ये वाढ करण्याचा मनसुबा आहे आणि सर्व २८ स्टोअर्स व ऑनलाइन माध्यमांवर सुरू असेल
फ्लिपकार्ट होलसेल या भारतातील स्वदेशी फ्लिपकार्ट ग्रुपच्या डिजिटल बी२बी बाजारस्थळाने आज त्यांच्या सदस्यांसाठी बचतींमध्ये वाढ करण्याच्या मनसुब्यासह त्यांची समर कॅम्पेन ‘महामुनाफा उत्सव‘च्या लाँचची घोषणा केली. २० मे ते ३१ मे २०२२ पर्यंत सर्व २८ स्टोअर्स व ऑनलाइन माध्यमांवर आयोजित करण्यात आलेल्या या कॅम्पेनचा फ्लिपकार्ट होलसेल सदस्यांना विविध दर्जात्मक उत्पादने व विभागांमध्ये विविध विशेष व आकर्षक डिल्स देण्याचा मनसुबा आहे. या कॅम्पेनचा भाग म्हणून फ्लिपकार्ट होलसेल स्टेपल्स, पर्सनल केअर, डेअरी अॅण्ड फ्रेश, होम केअर, पॅकेज फूड्स आणि बेव्हरेजेस् अशा विभागांमध्ये विविध ऑफर्स देखील देणार आहे- जसे फ्लॅश सेल, धमाका डिल्स, ऑनलाइन एक्सक्लुसिव्ह, कॅट लेव्हल बास्केट ऑफर- (ईकॉम), ब्रॅण्ड बिल बस्टर्स, वेलकम ऑफर आणि केस पॅक ऑफर्स.
नुकतेच, फ्लिपकार्ट होलसेलने आठवडाभर चाललेली मोहिम ‘व्यापारी दिवस‘चे समापन केले. हा एमएसएमई व किराणा सदस्यांशी समर्पित प्रमुख सेल इव्हेण्ट आहे. ‘अनदेखे अनसुने ऑफर्स‘ या टॅगलाइनसह कंपनीच्या निदर्शनास आले की, औरंगाबाद मधील त्यांच्या जवळपास ४५ टक्के सदस्यांनी ऑनलाइन माध्यमांच्या माध्यमातून खरेदी केली, तर उर्वरित ५५ टक्के सदस्यांनी प्रत्यक्ष स्टोअर्समध्ये येऊन बहुतांश खरेदी केली. फ्रोझन नॉन-वेज, बेव्हरेजेस्, मसाले व ड्राय फ्रूट्स, डेअरी, इलेक्ट्रॉनिक्स व अप्लायन्सेस, फूटवेअर व अॅक्सेसरीज अशा विभागांनी सर्वाधिक खरेदीची नोंद केली.
फ्लिपकार्ट होलसेलची तंत्रज्ञान क्षमता व बाजारपेठेबाबत सखोल माहिती किराणा व एमएसएमईसाठी सर्वांगीण व अर्थपूर्ण विकास परिसंस्था सक्षम करते. व्यासपीठाच्या व्यापक नेटवर्कच्या माध्यमातून एसएमई ब्रॅण्ड्सना भारतभरातील बाजारस्थळामध्ये दृश्यमानता व उपलब्धता मिळते