Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

“फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार”


मुंबई:मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. राज ठाकरेंना 5 जानेवारील कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आता ॲमेझाॅन आणि मनसे वाद चांगलाच चिघळला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे नेते अखिल चित्रे यांनी ॲमेझाॅनला इशारा दिला आहे.

फिल्पकार्टने मराठी केलं आता ॲमेझाॅनची मस्ती उतरवणार, असं अखिल चित्रे यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.
19 तारखेला माझ्याविरोधात केस टाकली होती. आता राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचं दुसाहस त्यांनी केलं आहे. याची किंमत त्यांना मोजावी लागणार आहे. मराठीसाठी कोणत्याही केसेस अंगावर घेण्याची तयार आहोत हे अ‍ॅमेझॉनने लक्षात ठेवावं, असंही चित्रे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, अ‍ॅमेझॉनला महाराष्ट्रात व्यवसाय करु देत आहे हे विसरता कामा नये. अ‍ॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार हे नक्की आहे, असंही एबीपी माझाशी बोलताना चित्रे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि अॅमेझॉन (Amazon)यांच्यात सुरु असलेला ‘नो मराठी, नो अ‍ॅमेझॉन’ वाद आता चिघळला आहे. आता हा वाद कोर्टात गेला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेला अॅमेझॉननं कायदेशीर नोटीस बजवली आहे.
अॅमेझॉननं राज ठाकरे यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे. दिंडोशी कोर्टानं (Dindoshi Court) या प्रकरणी राज ठाकरेंसह मनसे कामगार सेनेला नोटीस बजावली आहे. 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे त्यांना आदेश देण्यात आले आहेत.मनसे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतील अॅमेझॉन कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात उपस्थित राहण्यास मज्जव करण्यात आला आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुढल्या 5 जानेवारीला त्याची इच्छा असल्यास उपस्थित राहू शकतात, असं दिंडोशी कोर्टानं बजावलेल्या नोटिशीत म्हटलं आहे.अॅमेझॉनच्या अॅपवर इतर भाषाप्रमाणे मराठीला सामावून घेण्याचा मनसेचा आग्रह आहे. त्याला अॅमेझॉन सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने हा वाद सुरू झाला आहे. मनसेच्या वतीने ‘नो मराठी नो अॅमेझॉन’ ही मोहीम राबवली जात आहे. त्यात आता या नोटीसमुळे वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
अॅमेझॉनल सनदशीर मार्गानं आंदोलन केल्याचं समजत नसेल तर आता मनसे आपल्या स्टाईलनं आंदोलन करेल, अशी प्रतिक्रिया मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चौहान यांनी दिली आहे

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close