सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला आग

पुणे : कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला भीषण आग लागल्याचे धक्कादाय वृत्त समोर येत आहे. पुण्यातील मांजरा परिसरात सीरम इन्स्टिट्यूटची ही नवीन इमारत आहे. कोरोना नष्ट करणाऱ्या कोव्हिशील्ड लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येत आहे. दुपारी दोन वाजता ही आग लागल्यानंतर या इमारतीमधून धुराचे लोट बाहेर येत होते. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहे. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे
कोरोना लसीच्या पुरवठ्यावर परिणाम नाही
कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. दरम्यान लसीची निर्मिती ही सीरम इन्स्टिट्यूटच्या जुन्याच इमारतीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मिळत आहे. पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आग मोठी आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 10 ते 15 गाड्या आग विझवण्याचं काम करत आहेत. या आगीत कुठलीही जीवितहानी झाल्याची प्राथमिक माहिती नाही. तसंच सिरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशील्ड या लसीच्या निर्मिती आणि पुरवठ्यावर या आगीचा कुठलाही परिणाम होणार नसल्याचं बापट म्हणालेत.