Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

माती परीक्षणानुसारच खते वापरावीत :मिलिंद बिडबाग

उस्मानाबाद/ mh20live Network

माती परीक्षण अहवालावरून जमिनीचा कस व सेंद्रिय कार्बनचे प्रमाण यासोबतच जमिनीच्या आम्लधर्मी , क्षारयुक्त किंवा चोपण आहे का ? यांचे निदान होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी माती परीक्षण अहवालानुसारच खते वापरावीत असे आवाहन लोहारा तालुका कृषी अधिकारी मिलिंद बिडबाल यांनी केले.लोहारा तालुक्यातील जेवळी येथे शेतकऱ्यांच्या शेतीशाळेचे आयोजन दि.१५ जून रोजी करण्यात आले होते. त्यावेळी ते‌ शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत होते. यावेळी कृषी सहाय्यक गणेश बिराजदार ,पोकरा योजनेचे समूह सहाय्यक शिवाजी गायकवाड व प्रशिक्षित शिक्षक विद्या बिराजदार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना बिडबाग म्हणाले की, माती परीक्षणावरून जमिनीची सुपीकता , उत्पादकता व आरोग्य समजण्यास मदत होते. तसेच सुदृढ माता, सुदृढ बाळ याप्रमाणेच सुपीक जमीन व जमिनीचे आरोग्य श्रीमंत असेल तरच ती चांगले उत्पादन देते असे सांगून ते म्हणाले की,जमिनीतील जीवसृष्टीच्या वाढीसाठी पोषक वातावरण म्हणजेच जमिनीचे आरोग्य चांगले असते असे त्यांनी शेवटी सांगितले. तर यावेळी गणेश बिराजदार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाणे उगवनशक्ती आणि बीजप्रक्रियाचे प्रात्यक्षिक करून दाखवले व पोकरा आणि मनरेगा अंतर्गत फळबाग लागवडीची माहिती देऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.या कार्यशाळेसाठी सहदेव दामाजी भोसले,नागेश आळंगे,बसवेश्वर एकनाथ शिंदे ,उमराव माने,अशोक  शिंदे,लक्ष्मण मोरे,ज्योतीराम घोरपडे,कविता भोसले ,मनोज हराळे,यादव मोरे ,यशवंत चव्हाण यांच्यासहशेतकरी मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थितहोते

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close