Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

कन्नड:बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा फडशा-शेतकरी भयभीत , वनविभाग घटनास्थळी दाखल

बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा फडशा-शेतकरी भयभीत , वनविभाग घटनास्थळी दाखल

कन्नड/mh20live newtork

बिबट्याच्या हल्ल्यात वासराचा फडशा पाडल्याची घटना तालुक्यातील खेडा शिवारात घडली असून,या मुळे शेतकरी भयभीत झाले आहे. सदर घटनेची माहिती कळताच घटनास्थळी वनकर्मचारी पोहचून परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे.   या बाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील आठेंगाव  खेडा येथील शिवारातील गट.क्र.87 ,मध्ये शेतकरी नारायण दहातोंडे यांच्या मालकीची जमीन असून या जमिनीत शेतकऱ्याने आपली जनावरे बांधलेली होती.दि.8 डिसेंबर मंगळवार रोजी रात्री बिबट्याने हल्ला करून शेतकऱ्याचा वासराचा फडशा पाडला.या घटनेची माहिती साहाय्य वन संरक्षक सचिन शिंदे,वनपरिक्षेत्र अधिकारी पेहेरकर यांना कळताच त्यांनी वनपरिमंडळ अधिकारी प्रवीण कोळी , वनरक्षक एम. ए. शेख ,वनमजुर अशोक आव्हाड यांना घटनास्थळी जाण्याच्या सूचना दिल्या.या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मयत वासराचा पंचनामा करून परिसरात बिबट्याच्या पायाचे ठस्याची पाहणी केली.व परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविले. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शेतात जाताना मोबाईल चे गाणे वाजविणे,हातात काठी ठेवणे ,उजेडासाठी बॅटरी  ठेवने असे आवाहन कन्नड प्रादेशिक वनविभागाने केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close