Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

कृषी योजनांच्या विविध लाभासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रे महाडीबीटी वेबपोर्टलवर तात्काळ अपलोड करावेत

अलिबाग, जि.रायगड, दि.19 :- आपले सरकार महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजनेंतर्गत कृषी यांत्रिकीकरण , ठिबक व तुषार सिंचन , फलोत्पादन लागवड, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अशा विविध योजनेंतर्गत दि. 11 जानेवारी 2021 रोजी अर्ज करण्याची अंतिम तारीख होती.
त्याप्रमाणे विविध योजनंच्या लाभाकरिता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले आहेत. सादर केलेल्या अर्जांची राज्यस्तरावर छाननी करून सोडत जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ज्या लाभार्थ्यांच्या मोबाईलवर लघुसंदेश (एसएमएस) आले आहेत त्या लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
तरी लघुसंदेश (एसएमएस) प्राप्त झालेल्या शेतकरी लाभार्थ्यांनी लाभ मिळण्याकरीता अर्ज केलेल्या योजनेसंबंधी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता महाडीबीटी पोर्टलवर करावी. महाडीबीटी पोर्टल वापरासंबंधी अडचणी /समस्या असल्यास तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्वला बाणखेले यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close