Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

कन्नड:अंबाडीच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या

पाटबंधारे कार्यालया समोर शेतकऱ्यांने केले जागरण

कन्नड : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कै. आप्पासाहेब नागदकर प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांना उजव्या कालव्याला पाणी सोडावे, यासाठी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात गुरुवारी दिनांक २१जानेवारी पासून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही, अशी भूमिका कार्यालयाबाहेर ठिय्या मांडलेला शेतकऱ्यानी घेतली आहे. गुरुवार ( ता.२१) सकाळी अकरा वाजेपासून ठिय्या मांडून बसलेले शेतकऱ्यांनी रात्रही पाटबंधारे विभाच्या कार्यालया समोर वाघया मुराळी यांच्या उपस्थितीत जागरण करत रात्रभर जागून काढली. दरम्यान आंदोलन करते शेतकरी यांच्यानुसार पाटबंधारे विभागाकडे गेल्या अनेक दिवसांपासून उजव्या कालव्याला पाणी सोडावे यासाठी मागणी करण्यात येत आहे .शिवाय अनेक शेतकऱ्यांनी स्वखर्चाने कालव्याची दुरुस्तीही करून घेतली आहे परंतु पाटबंधारे विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यात योग्य समन्वय नसल्याने शेतकऱ्यांची पिके घोक्यात आले आहे . शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन अक्रमक होऊ नये म्हणून प्रकल्पाचे शाखा अभियंता जारवाल यांनी रात्री उजव्या कालव्याची पाहणी केली.पहाटे आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना शाखा अभियंता जारवाल यांनी आश्र्वासन दिल्यानंतर शेतकरी आपल्या घरी गेले . शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सकाळ पासून सुरू असताना देखील ना उप अभियंता ,ना कार्यकारी अभियंता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आले नाहीत . यामुळे शेतकरी अधिक आक्रमक झाले होते.राज्यातील आघाडी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असताना जर शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करत असतील तर या अधिकाऱ्यांना जलसंपदा मंत्री यांनी जाब विचारला पाहिजे अशी मागणी शेतकरी करत होते.

मागील काही दिवसांपासून कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने मनुष्यबळ अभावी कालव्याला पाणी सोडण्यासाठी विलंब झाला शिवाय शेतकऱ्यांनी सुद्धा पाणी मागणी पत्र सादर केलेले नाही आणि आता पाणी सोडण्यासाठी अचानक मागणी केली आहे परंतु तरीही तात्काळ दखल घेवून सोमवार पर्यन्त पाणी सोडण्यात येईल.-
अनिलकुमार निंभोरे कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग

नियमानुसार पाणीपट्टी भरलेल्या शेतकऱ्यांना पाणी देण्यास हवे होते.या हंगामात पाटबंधारे विभागाने आजपर्यंत उजव्या कालव्याला पाणी सोडलेले नाही यामुळे शतकर्यांचे पिके धोक्यात आले आहे जोपर्यंत पाटबंधारे विभाग आमची दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही – सचिन पवार, शेतकरी या आंदोलनात सचिन पवार,जाधव, दिनेश जाधव, श्रीहरी दापके, प्रवीण जाधव, कडुबा जित्ते, दामूजाधव, बाळू जाधव, रमेश सिरसाट,प्रल्हाद सिरसाट, शिवनाथ दापके, बाळू गपक, बाळू शिंदे, आप्पासाहेबजगदीश जाधव, साबळे, संदीप वाघ ,अशोक मुठे, सुशील मोरे, कैलास ठिय्या आंदोलनात सहभागी आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close