Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सर्व पिकास बीजप्रक्रिया करुनच पेरणी कराव: तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे

गंगापूर :सर्व शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सर्व पिकास बीजप्रक्रिया करुन पेरणी केल्यास पीकांची वाढ होऊन धोका निर्माण होत नाही ऊत्पन्न मोठ्या प्रमाणात मीळते बीजप्रक्रियानेच पेरणी करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर तारगे यांनी   केले 
      दहेगाव बंगला  येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत मुग पिकाचे दहा हेक्‍टर क्षेत्रावर 25 शेतकऱ्यांना प्रत्येकी 0. 40 हेक्टर प्रमाणे मुग बियाणे (उत्कर्ष) तसेच  बीजप्रक्रियेसाठी जैविक संघ 100 मीली लीटर.कृषी विभागामार्फत उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांच्या हस्ते 25 शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले यावेळी कृषी अधिकारी तारगे बोलत होते
    तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर तारगे, मंडळ कृषी अधिकारी अशोक बीनगे ,कृषी पर्यवेक्षक सुनील ओझा,सरपंच अर्जुन घुसाळे  यांची प्रमुख उपस्थिती होती
      बी .बी. एफ तंत्रज्ञान पेरणी केल्यास जास्त पाऊस झाले तरी कमी पाऊस झाला तरी कसा उपयुक्त ठरतो याबाबत  उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले तर मंडळ कृषी अधिकारी अशोक केंद्रे म्हणाले लीबांच्या झाडावर लीबोंळ्या मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी आत्ता निंबोळी जमा करून येणाऱ्या काही दिवसात खरीप पिकांची वाढीच्या अवस्थेत निंबोळी अर्क घरच्या घरी तयार करून फवारणी करावी जेणेकरून उत्पादन खर्चात शेतकऱ्यांना बचत होईल असा विश्वास  केंद्रे यांनी व्यक्त केला
    कृषी सहाय्यक उषा वाघमोडे ,अमोल जंगले, छत्रपती शिवाजी गटाचे अध्यक्ष  संदीप मस्के कानू घुसाळे ,शंकरसिंग डोंगर जाळ, संजय सिंग बायर ,आप्पासाहेब पारधे ,संजय मस्के, राजेंद्र राजळे, शेख रहीम शेख बुढण आदी मूग प्रात्यक्षिक लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचालन आभार कृषि सहाय्यक  सुनील ओझा यांनी केले

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close