Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

शेतकरी आंदोलन : भारत बंदला स्वतंत्र लोकसत्ता पक्षाचा पाठिंबा

भाजपच्या दडपशाही विरोधात शेतकऱ्यांचा भारत बंद : रत्नाकर खंडागळे 



 औरंगाबाद / प्रतिनिधी  केंद्र सरकारचे तीन काळे कृषी कायद्याच्या विरोधात  ८ डिसेंबर  रोजी पुकारलेलया  भारत बंदला स्वतंत्र लोकसत्ता पक्षाने पाठिंबा असून  भाजपच्या दडपशाही विरोधात शेतकऱ्यांचा भारत बंद आंदोलन आहे.      केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांचा आणि कृषी विरोधी  धोरणाचा निषेध करण्यासाठी तसेच अन्नदात्याला पाठिंबा देण्यासाठी छोटे व्यावसायिक, व्यापारी, कामगार , नोकरदारांनी  या आंदोलनात सहभागी होऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन स्वतंत्र लोकसत्ता पक्षाचे प्रमुख रत्नाकर खंडागळे यांनी केले आहे. 

       ८ डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंद ला स्वतंत्र लोकसत्ता पक्षाने पाठींबा दिला असून  केंद्र सरकारने पारित केलेले तिन्ही कृषी कायदे हे शेतकरी विरोधी असून कृषी क्षेत्र भांडवलदारांच्या हातात दिल्या जात आहेत . शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे  केंद्र सरकारचे  धोरण  असल्याचे खंडागळे यांनी म्हंटले आहे. 
       पुढे बोलताना खंडागळे म्हणाले की , आमचा एक सैनिक सीमेवर लढत आहे तर दुसरा  शेतकरी सैनिक  देशाला अन्न धान्य पुरवण्यासाठी शेतात राबतो .  जवान  आणि शेतकऱ्या मुळे आम्ही सुरक्षित आहोत.  आज आमचा अन्नतादाताच  संकट आहे  तेव्हा   आमच्या शेतकरी बांधवासाठी  पुन्हा जय जवान  जय किसान  हि घोषणा देत  सर्वानी या भारत बंद आंदोलनात सामील व्हावे.   
 केंद्र सरकारच्या कृषी धोरणाचा निषेध  म्हणून घरावर काळा  ध्व्ज फडकावा               ज्यांना प्रत्येक्ष आंदोलनात  सामील होता  येत नाही  त्यांनी   आपल्या  घरावर केंद्र सरकारचा निषेध म्हणून काळ ध्वज किव्हा  तुम्हाला जो आवडत असेल तो ध्वज फडकवून       अन्नदात्याच्या आंदोलनात सहभागी व्हावे  असे अवाहन स्वतंत्र लोकसत्ता पक्षाचे प्र‘ुख रत्नाकर खंडागळे यांनी  केले आहे.  
टाळूवरील लोणी खाणारे कोण आहेत...
शेतकरी आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठींबा म्हणजे टाळूवरील लोणी खाण्यासारखे  असल्याचे  शरद पवार यांचे नाव न घेतत्यांच्या भूमिकेवर   रत्नाकर खंडागळेयांनी  टीका  केली आहे. शेतकरी विरोधी बिल  पास होत असतांना संसदेत  गैर हजर राहायचे आणि दुसरीकडे   शेतकरी आंदोलनाला पाठींबा  द्यायचा  म्हणजे टाळूवरील लोणी खाण्यासारखेच  आहे.   

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close