Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

फर्दापुर पोलिसांमुळे वाचले एका तरुणाचे प्राण*….


वेळ आली होती मात्र काळ आला नव्हता….. दैव बलतर म्हणुन वाचले प्राण

सोयगाव / प्रतिनिधी 

जगप्रसिध्द अजिंठा लेणी यंदा झालेल्या पावसामुळे हिरवळी ने नटली असुन पर्यटकांना साद घालत खुनवत आहे.अजिंठा पर्वत रागेंत सातकुंड धबधबा बघण्याचा मोह आवरता येत नाही.गुरुवारी जळगाव येथील काही युवक व युवती परिसरातील नैसर्गीक सौदर्य न्याहळत असतांना सातकुंड धबधबा परिसरात सेल्फी फोटो शुट करतांना पाय पसरुन कुंडात पडला.वेळीच ही घटना फर्दापुर पोलीसांना तेथील उपस्थीत नागरीकांनी दिली असता , शर्तीचे प्रयत्न करुन प्राण वाचवण्यात सायंकाळी उशीरा यश आले असल्याची माहीती गुरुवारी (ता.१६) सूत्राकडून मिळाली.
 देवांशु मोर्य आसे त्या युवकाचे नाव आहे, वय २१ राहणार एफ-१०१ बिल्डींग नंबर २५/०२६ श्रीप्रस्थ कॉलनी नालासोपारा वेस्ट पालघर -४०१२०३ ह.मु. सिव्हिल हॉस्पिटल शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव येथे द्वितीय वर्ष एमबीबीस(डॉक्टर)चे  शिक्षण घेत आहे. हा आपल्या मित्र व मैत्रीणींसह अजिंठा लेणी बघण्यासाठी गेला.दरम्यान सातकुंड परिसरात सेल्फी फोटो शुट करित असतांना शेवाळवर पाय घसरुन कुडात खोलवर पडला. प्राण वाजवण्यासाठी आक्रोश करीत असतांना काही नागरीकांना आढळुन आला.क्षनाचाही विलंब न करता त्यानी सदरची घटना फर्दापुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक युवराज शिंदे, अंमलदार सचिन काळे, नारायण कोडे,यांना दीली माहीती मिळताच फौज फौट्यासह पोलीसांनी तातकाळ कुच करित नागरीक व  अजिंठा लेणी येथील भारतीय पुरातत्व विभागाचे के.के.शेख,भारत काकडे,शेख शमीम,प्रकाश सपकाळ,शालीक सपकाळ,सरक्षा रक्षक गार्ड शेख अनवर, सर्वेक्षण कर्मचारी एस.आय.एस  सुरक्षा रक्षक, व स्थानिक लोकांची मदत घेउन सुखरुप बाहेर काढले. यांनी सुद्धा सहकार्य केले.

 जगप्रसिध्द अजिंठा लेणी बघण्यासाठी जगभरातील प्रर्यटक लेणीचे सौदर्य न्याहळत असतांना सातकुंड परिसरात पाय घसरुन पडल्याच्या या पुर्वी सुद्धा अनेक घटना घडलेल्या आहेत.वेळ प्रसंगी मदती च्या अभावामुळे प्राण ही गमवावे लागले आहेत.युवक व युवतींनी सातकुंड परिसरात सेल्फी फोटो काढण्या मोह … आवरावा आपल्या घरातील बालगोपाल आई-बाबा,पत्नी,मुल-मुली,भाउ बहीणी वाट पहात असतात दुरदैवी घटणा घडू नये परिवाराचा सहारा दुराउ नये समजुन डेंजर झोन मध्ये फोटू शुट साठी जावू नये असे आवाहन विजय मराठे,उपविभागीय पोलिस अधिकारी सिल्लोड, सपोनि अमोल मोरे , युवराज शिंदे यांनी केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Back to top button
Close
Close