Subscribe to our Newsletter
Loading
महाराष्ट्र

प्रसिध्द गायक प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांचे कोरोना योध्दांसाठी “जिते INDIA हमारा” गीत ; सेलिब्रेटींचा सहभाग असलेले बहारदार नाविन्यपूर्ण गीत


MH20Live Network

सुप्रसिद्ध गायक प्रमोद सरकटे यांच्या भारदस्त आवाजात सुरू होणारा हा व्हीडीओ आणि कोरोना च्या या वातावरणात कोरोना योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी व मनोबल वाढविण्यासाठी गीतांचे यथोचित शब्द, चाल ,संगीत व व्हीडीओ तील अनेक मन हेलावून टाकणारी व स्फूर्ती देणारी दृष्य खूपच परिणामकारक आहेत. पद्मश्री अनुप जलोटा , पद्मश्री पं.सुरेश वाडकर यांचा मनोबल वाढविणारा सुरेल आवाज व श्रवणीय स्वरांनी “जिते INDIA हमारा” हे गीत अजुनच भारदस्त झाले आहे.

विशेष म्हणजे सर्वांचे मनोबल वाढविण्यासाठी यामध्ये तडफदार पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचा या गीतामध्ये विशेष सहभाग व त्यांचे आवाहन , तसेच मुंबई  पोलिस महानिरीक्षक अमितेशकुमार यांचा संदेश ,आणि मुंबई हून पो.उपमहानिरीक्षक हरिष बैजल, पो.उपमहानिरिक्षक नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांचा विशेष सहभाग आहे. अनेक नामांकित वैद्यकीय संस्था व नामांकीत डॉक्टर्स यांचा सहभाग पण महत्वपूर्ण आहे. डॉ.प्रविण सूर्यवंशी (एमजीएम), डॉ.समीर कदम (एमजीएम), डॉ.विजय सुरासे (ज्युपिटर मुंबई), डॉ. विजयेंद्र व डॉ. तनुजा इंगळे (लंडन), डॉ.अमोल कुलकर्णी (धूत हॉस्पीटल), डॉ.रंजळकर (आयएमए ),डॉ. गाडे (आयएमए),डॉ.निकाळजे (एमजीएम),डॉ.हांडू (लंडन), डॉ.नागरे, डॉ. किर्ती सरकटे(एमजीएम),डॉ.कस्तुरी बाराळे,डॉ.तोष्णीवाल, अभिनेते विजय कदम आदींचा सहभाग कोरोना योद्ध्यांचे मनोबल वाढविणारा आहे.

या गीताचे निर्माता प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांचे दमदार गायनासोबतच झी टीव्ही सारेगमप फेम गायिका अमृता नातू, पार्श्वगायिका योगिता गोडबोले यांनी मुंबई हून खास ऑनलाईन गीत ध्वनिमुद्रित करून या गीतामध्ये मधुरता आणली आहे. प्रमोद सरकटे यांच्या लंडन मधील शिष्या लावण्या व पुजा तसेच डॉ.कस्तुरी बाराळे पण गीतामध्ये सहभागी आहेत. गीत ,संगीत व स्वरबद्ध प्रमोद सरकटे यांनी केले , गायन व संकल्पना स्वराज सरकटे यांची तसेच व्हीडीओ एडीटींग, मास्टरींग युवराज सरकटे यांनी केलेय.

सोशल मेडीया वर या व्हीडीओ सॉंगचा प्रोमो पण गाजला. सर्वांच्या प्रतिक्षेत असणारे “जिते india हमारा” हे व्हीडीओ गीत नक्कीच सर्वांना आवडणारे ठरेल व आजही कोरोनाच्या अत्यंत बिकट परिस्थिती मध्ये कोरोना योद्ध्यांना मनोबल वाढवणारे ठरेल अशी आशा व खात्री गायक व संगीतकार प्रमोद सरकटे व स्वराज सरकटे यांनी व्यक्त केली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close