Subscribe to our Newsletter
Loading
क्राईम

फेसबुक मित्राने केला तरुणीवर बलात्कार –


नागपूर ( प्रतिनिधी ) आज आपण डिजीटल युगात तरुण तरुणी हे सोशल मिडिया चा वापर करत आहे,याचा फायदा चागला पण आहे पण वाईट पण तिकाच होतो.
टवाळकी करणाऱ्या युवकाने महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुलीला आपल्या प्रेम जाळ्यात ओढले. नंतर तिचा व्हाट्स अप नंबर मिळविला.त्यावरून तिच्याशी जवळीक साधली आणि तिला लग्नाचे आमिष देऊन बलात्कार केला.त्याची व्हिडीओ क्लिप बनविली.आणीनंती सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केला.त्याचा तिच्या लहान बहिणीवर देखील डोळा होता. तो आपल्या सोबत तिला देखील बदनाम करणार हे समजल्यावर तिने हा सगळा प्रकार आईला सांगितला आणि त्यानंतर त्याच्या विरोधात तक्रार केली.

जगदीश केशव आर्वीकर असे त्या आरोपीचे नाव आहे तो बांगलादेश , नाईक तलाव येथील रहिवाशी आहे. त्याने २ एप्रिल २०१८ रोजी सदर मुलीला फ्रेंड रिक्वेष्ट पाठवली. मुलीने ती ऍक्सेप्ट केल्यावर फेसबुक वर चॅटिंग सुरू केले.मग हळूच तिचा व्हाट्सएप नंबर मिळविला आणि मग त्यावर ते तासनतास बोलत बसायचे. जग्गू नेहमी तिला भेटायची ईच्छा व्यक्त करायचा. पहिल्यांदा त्यांची भेट फुटाळा तलावावर झाली पहिल्याच भेटीत त्याने तरुणीला फ्लॅट करून टाकले.  तो पुन्हा तिला भेटी साठी बोलावू लागला. मुलीचे वडील व्यवसाय करीत असल्याने ते सकाळी निघून जायचे तर आई गृहिणी असल्याने ती घरात राहायची. एक दिवस घरी कोणी नसल्याने जग्गू ला तिने घरी बोलवले. घरी गेल्यावर त्याने तिच्या समोर शरीरीक संबंधाची मागणी ठेवली.तिने नकार दिल्यावर त्याने तिच्यावर जबरदस्ती करून सबंध प्रस्थापित केले आणि तिचे नग्न फोटो आणि व्हिडीओ बनविले. आणि ते व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्याचा तिच्या लहान बहिणीवर देखील डोळा होता.ही बाब तिला समजल्यावर तो तिच्या सोबत देखील असेच करणार यामुळे तिने हा प्रकार तिच्या आईला सांगीतला.त्यानंतर त्या दोघींनी मिळून तहसील पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदविली . पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवून जगदीश आर्वीकर याला अटक केली आहे.
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close