सामाजिक आशयाचे प्रयोगशील चित्रपट आता औरंगाबादेत निर्माण होतील ; “बाबा” लघुपटाच्या प्रीमियर शो प्रसंगी कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांचा विश्वास

औरंगाबाद | चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी चागल्या तांत्रिक बाजूची उभारणी एमजीएम ने केली आहे. त्यामुळे चित्रपट निर्मितीसाठी मुंबई-पुण्याला जाण्याची गरज, मराठवाड्यातील कलावंताना पडणार नसून आगामी काळात जागतिक पातळीवरचा ऑस्कर पुरस्कार मिळविण्यासाठी सामाजिक आशयाचे प्रयोगशील चित्रपट, आता औरंगाबादेतच निर्माण होतील असा विश्वास, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांनी व्यक्त केला. एमजीएम फिल्म आर्ट विभागातील चित्रमहर्षी व्ही. शांताराम चित्रपट गृहात आदर्श प्रोडक्शन निर्मित व सचिन ठोकळ दिग्दर्शित “बाबा” या लघुपटाच्या प्रीमियर शो प्रसंगी ते बोलत होते.
प्रारंभी चित्रमहर्षी व्ही. शांताराम यांच्या प्रतिमेस अभिवादन करून बाबा या लघुपटाच्या प्रीमियर शो चे उद्घाटन एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुधीर गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, फिल्म आर्ट विभागाचे विभागप्रमुख शिव कदम, सवेरा ग्रुप चे संचालक अजिंक्य अतुल सावे, दैनिक देवगिरी वृत्त चे संपादक अनिल सावंत, महाव्यवस्थापक प्रशांत सुर्यतळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी, राज्य परिवहन कामगार सेनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक पवार पाटील, ज्युनियर लक्ष्या धर्मराज होलीये, आमदार अमृततुल्यचे संचालक सुनील जाधव, दिग्दर्शक सचिन ठोकळ, मिडिया प्रमुख सचिन अंभोरे, अभिनेता नंदकिशोर सूर्यवंशी, आरजे राखी, सिनेम्याटोग्राफर अभिजित गाडेकर, संगीतकार अनिकेत गाडेकर आकाश ठोकळ, साक्षी राठोड, मानसी शेवाळे, ज्ञानेश्वर तुपे, यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना कुलगरू डॉ. सुधीर गव्हाणे म्हणाले कि, आजही ग्रामीण भागात मुलगी नकोशी वाटणे हे वास्तव आहे. आपल्या मुलांसाठी जीवाचे रान करणाऱ्या शेतकरी पित्याची कहाणी बाबा या लघुपटामध्ये चित्रित करून तो मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिग्दर्शक सचिन ठोकळ यांनी केला आहे. या लघुपटात कोणतीही रंगरंगोटी नाही. गाण्यांपुरते मनोरंजन नाही तर थेट सामाजिक वास्तव समर्थपणे मांडण्याचे धाडस येथे करण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येक पित्याने आपल्या मुला-मुलींसाठी केलेल्या कष्टाचे चित्रण या लघुपटात केले असल्याने भावनिक साद चित्रपटातील कलावंतानी आपल्या अभिनयातून घातली आहे. दिग्दर्शक सचिन ठोकळ आणि निर्माता सचिन अंभोरे यांनी एक चांगली कलाकृती मराठवाड्यातील प्रेक्षकांना दिली हि कौतुकास्पद बाब आहे. सामाजिक भाष्य करायला लावणारा हा चित्रपट आहे. मित्र कसा असावा तर तो बाबांच्या मित्रासारखा असायला पाहिजे असा संदेश देणारी सचिन अंभोरे यांची भूमिका अभिनंदनीय आहे.
एमजीएम जनसंवाद व वृत्तपत्र विद्या विभागाच्या विभागप्रमुख डॉ. रेखा शेळके म्हणाल्या कि, औरंगाबाद मध्ये चांगले कलावंत आहेत. त्यांना खऱ्या अर्थाने प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. सचिन अंभोरे यांनी समाजातल्या विविध घटनांची बातमी करतांना त्यातील वास्तव हे या रुपेरी पडद्यावर मांडून चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. कलाकारांसाठी नेहमीच एमजीएम हवी ती मदत करेल असे आश्वासन देत पुढील वाटचालीसाठी शुभेछ्या दिल्या. चांगल्या सामाजिक अश्यायांची मांडणी असलेल्या सिनेमांची निर्मिती आगामी काळात आदर्श प्रोडक्शन ने करावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना तर फिल्म आर्ट विभागाचे विभाग प्रमुख शिव कदम म्हणाले कि, चित्रपटाच्या तांत्रिक बाजू या चित्रपटातील कलावंताना आणखी जिवंत करत आसतात, त्यामुळे आदर्श प्रोडक्शन ने एक चांगला प्रयत्न औरंगाबादेत बाबा या लघुचित्रपटाच्या निमित्ताने केला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला आगामी काळात आपण हे दाखवून देऊ कि खुप चांगली आणि मेहनती कलावंत या मराठवाड्यात आहेत. आणि चांगल्या कलावंतासाठी नेहमीच एमजीएम संस्था पुढाकार घेईल असे आश्वासन यावेळी विभाग प्रमुख शिव कदम यांनी यावेळी दिले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून चित्रपटातील कलावंताना शुभेछ्या दिल्या. यावेळी सर्व कलावंतांच्या आई-वडील तसेच मित्र परिवारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शीतल राठोड, म्याजीकटच इव्हेंट्सचे शुभम अग्रवाल नीलम कांबळे, सिद्धी घायाळ, रोहित मोतीचूर, अमोल मगरे, अभिजित शेवाळे, सुनील सदावर्ते, अमोल जोगदंड, आदित्य सोनवणे, गणेश भालेराव, आदींनी पुढाकार घेतला