Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

अशोक चव्हाणांची मराठा समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा: मराठा क्रांती ठोक मोर्चा

औरंगाबाद – मराठा आरक्षणावरील स्थगिती जर २५ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी उठली नाही तर २६ जानेवारीपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत मराठा क्रांती मोर्चाने यापुढची लढाई रस्त्यावर उतरुन लढू, अशी आक्रमक भूमिका घेतली आहे.
मराठा समाजासाठी राज्य सरकारने ईडब्यूएसच्या आरक्षणाची घोषणा केली होती. ईडब्यूएसचे आरक्षण दिल्यानंतर मराठा समाजाचा राग कमी होईल, असा सरकारचा मानस होता. पण सरकारच्या निर्णयानंतर मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘ईडब्यूएस आरक्षणासाठी आम्ही लाखोंच्या संख्येने ५८ मोर्चे काढले नव्हते, किंवा आमच्या ४२ बांधवांनी यासाठी हौतात्म्य पत्करले नाही. जर २५ तारखेला आरक्षणावरील स्थगिती उठली नाही तर २६ तारखेपासून मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि या सरकारमधील मंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही. आरक्षणाचा प्रश्न निकाली लागेपर्यंत मराठा समाज आंदोलन सुरुच ठेवणार, राज्य सरकारला मात्र यानंतर त्याची किंमत चुकवावी लागेल,’ अशी आक्रमक भुमिका रमेश केरे पाटीलांनी मांडली.
‘सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात राज्य सरकार वारंवार अपयशी ठरत आहे. मराठा समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांची तात्काळ हकालपट्टी व्हावी आणि त्यांच्या जागेवर मंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा बाळासाहेब थोरात यांपैकी कुणाचीही नियुक्ती मुख्यमंत्र्यांनी करावी,’ अशी मागणी यावेळी केरे पाटीलांनी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने केली.
‘उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाणा यांना मराठा समाजाला आरक्षणच द्यायचे नाही. म्हणून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटवला जातोय. मंत्री शपथ घेताना संविधानाला साक्ष ठेवून कोणत्याही समाजाप्रती सूडाची भावनी ठेवणार नाही. मग आरक्षणाप्रसंगी एका समाजाची बाजू घेऊन कसे काय बोलू शकतात,’ असे म्हणून केरे यांनी विजय वडेट्टीवार, छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या पञकार परिषदेस मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील,अमीत घाडगे,संजय सावंत,किरण काळे पाटील,ज्ञानेश्वर गायकवाड,लक्ष्मण मोटे,अप्पासाहेब जाधव,अनिल शिरवत,अनिल कुटे,दत्ता भोकरे यांच्यासह आदींची उपस्थीती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close