Subscribe to our Newsletter
Loading
देशविदेश

मोदी सरकारसमोर लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन सादर

नवी दिल्ली,/mh20live
कोरोना विषाणूच्या पृष्ठभूमीवर देशात सध्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. हा टप्पा ३१ मे रोजी संपणार आहे. दरम्यान, आपत्कालीन वैद्यकीय सेवा, रुग्णालयांची उपलब्धता, विलगीकरण आणि क्वारंटाईन सुविधा या बाबींची जबाबदारी असलेल्या केंद्र सरकारच्या पॅनलने मोदी सरकारसमोर लॉकडाऊनचा एक्झिट प्लॅन सादर केला आहे. तसेच पॅनलने मोदी सरकारला काही शिफारशी केल्या आहेत. यापुढे लॉकडाऊन वाढवण्यात येऊ नये, अशी शिफारस पॅनलने मोदी सरकारला केली आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतची माहिती दिली आहे. 
 दोन पॅनलने सरकारसमोर लॉकडाऊन ४ मधून बाहेर पडण्याचा प्लॅन सादर केला. कंटेन्मेंट झोनमध्ये सध्या असलेले नियम तसेच रहावेत, किंबहुना त्यापेक्षा ते कडक केले जावेत, तर उर्वरित भाग खुला करावा, अशी शिफारस करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह आणि धार्मिक स्थळे बंद ठेवावीत. इतर सर्व बंधने काढून टाकावी, अशी शिफारस पॅनलने केल्याचे वृत्तसंस्थेला सूत्रांनी सांगितले. दरम्यान, आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याची शिफारस करण्यात आलेली नाही.


अंतिम निर्णय पुढच्या काही दिवसात घेतला जाणे अपेक्षित आहे. कोरोनाशी संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी गृह मंत्रालयाने मार्च महिन्यातच विविध ११ गटांची नियुक्ती केली होती. आपत्कालीन वैद्यकीय सेवा गटाचे नेतृत्त्व निती आयोगाचे सदस्य विनोद पॉल यांच्याकडे आहे. तर रुग्णालय उपलब्धता, विलगीकरण आणि क्वारंटाईन सुविधा गट, रोग निगराणी, चाचणी आणि अत्यावश्यक काळजी या गटाचं नेतृत्त्व पर्यावरण सचिव सी. के. मिश्रा करतात.

देशात आता राष्ट्रीय लॉकडाऊन सुरू ठेवू नये असा सल्ला देण्यात आला आहे. दरम्यान, जिथे केसेस वाढत आहेत, तिथे अत्यंत आक्रमकपणे चाचण्या आणि ट्रेसिंगसह कडक निर्बंध ठेवणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया या गटातील एका सदस्याने दिली.

शाळा, महाविद्यालये, सिनेमागृह आणि धार्मिक स्थळे, जिथे सोशल डिस्टन्सिंग पाळली जाऊ शकत नाही. ही स्थळे वगळता लॉकडाऊन मागे घ्यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे, असे एका सदस्याने सांगितले. दरम्यान, कोरोनाचे वाढते आकडे गेल्या १० दिवसात जवळपास दुप्पट झाले आहेत. ही चिंतेची बाब असल्याचे अधिकारी सांगतात. तर याचे अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतील, याचाही अभ्यास संबंधित गटाकडून केला जात आहे.

इतर देशांच्या तुलनेत भारतात सुरुवातीच्या काळातच लॉकडाऊनसारखे कडक निर्बंध घालण्यात आले, असे एका सदस्याने सांगितले. पाश्चिमात्य देशांनी लॉकडाऊनला विलंब केला, परिणामी मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तीय हानी झाली. आपण एक देश म्हणून आतापर्यंत मृत्यू दर नियंत्रणात ठेवला आहे. दरम्यान, अर्थव्यवस्थाही आता रुळावर कशी येईल ते पाहण्याची ही वेळ आहे, असे एका सदस्याने सांगितले

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close