Subscribe to our Newsletter
Loading
लाईफ स्टाईल

वाचा सविस्तर-शाळेतील जीवनातील आठवणी-:शाळा सुटली तरी मनात भरलेलीच असते…!

mh20live Network

आपली शाळा गावच्या मध्यभागी होती. तिची इमारत मला फार आवडायची. शाळेच्या ओट्यावर फार मोठी लोखंडी घंटा होती. शाळा भरण्यापूर्वी ती वाजवायची संधी मिळणे भूषणाचे काम होते. वर्गातल्या शहाबादी फरशांवर बसायला मजा यायची. फुटलेल्या फरशामधली वाळू आपण ऐकमेकांवर उधळण्याचे खेळ खेळायचो. टेलरच्या घरासमोर एक काचकुयरीचे झाड होते. त्याची पाने आणून पोर एकमेकांना लावायची. शाळेमागची पाण्याची टाकी भरून वाहू लागली की वर्गाच्या खिडकीतून स्पष्ट दियायची आणि त्यातून कोसळणारं ते शुभ्र पाणी डोळ्यांना सुखवायचे.

तू नेहमी एकच गोष्ट सांगायचास. आणि तिच एक गोष्ट आम्ही पुन्हापुन्हा तुला सांगायला लावायचो. तुमच्या समोरच्या खोलीत तुझे वडील आपल्याला गणित शिकवायचे. तुमच्या घरात अगरबत्ती आणि सिगारेटचा संमिश्र गंध यायचा. घरासमोरच्या सखल जागेत पावसात खूप पाणी साचायचे आणि दोन-चार दिवस तरी राहायचे. मग रात्रभर पार्श्वसंगीतासारखा बेडकांचा आवाज येत राहायचा.

तुमच्या दारातून आपण कागदी होड्या बनवून सोडायचो. शाळा सुटल्यांनतर मी गावी पळून जाणार आहे, असा निरोप ठेवून आपला मामाच्या घरी राहणारा एक मित्र खरंच गावी निघून गेला होता. ‘एका हाताने टाळी वाजते’ अस सांगणाऱ्या आपल्या एका वर्गबंधूला मास्तरांनी भयंकर झोडपून काढले होते. वहिनी माझ्याकडून धुणे – भांडे करून घेते, अस एक पत्र आपल्या मित्राने आई – वडिलांना लिहिले होते. शाळेच्या दप्तरात आमसूल घेऊन येणारा आपला एक वर्गमित्र होता. पण त्या आंबट दिवसांमध्ये भयंकर गोडवा होता.

‘उद्या इन्स्पेक्शन आहे’ अस म्हणून आपल्याला अचानक सुट्टी मिळायची. आपली एक मॅडम नेहमी भारतीय माणूस आणि अमेरिकन माणूस यांचे ठराविक पठडीतले जोक सांगत राहायची. शाळेच्या झेंड्यासाठी जो खांब होता, त्याच्यावर चढण्याचे अचपळ खेळ आपण खेळायचो. शाळेसमोरच्या कबड्डीच्या मैदानावर लाल माती आणून टाकलेली असायची. पावसाळ्यात त्या मैदानाचे पार  लाल तळे होऊन जायचे.

शाळेच्या स्टाफ रूममध्ये जाण्याची संधी मिळाली की जाम भारी वाटायचे. वजन मोजण्याचे मशीन मी सर्वात प्रथम तिथेच पाहिले होते. आपण आठवड्यात दोन – चारदा तरी वजन मोजण्याची हौस भागवून घ्यायचो. स्टाफ रूममध्ये नव्या -जुन्या पुस्तकांचे एक कपाट होते. कधीकधी तिथे पुस्तक चाळता यायची. आता आयुष्याची कितीतरी पाने उलटून आपण फार पुढे आलो आहोत. जुने दिवस आता पिवळ्या पडलेल्या पुस्तकांच्या पानांसारखे वाटतात. ज्यांचा गंधही आपण विसरत चाललो आहोत.

एकदा गावी प्रचंड पाऊस पडला होता. आपण पुलापर्यंत पायी चालत गेलो होतो. अगदी पुलावरून पाण्याचा लोट वाहत होते. लोहाराच्या म्हशी पुरात अडकल्या होत्या. लोहाराच्या जिवाची घालमेल होत होती, पण आपल्याला त्याचा गंध नव्हता. सगळ गाव पुलावर जमल होत. तशी काठोकाठ भरून ओसंडून वाहणारी नदी मी आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होतो. आता नदी तशी भरून येत नाही. आणि आपली मनेही कोरडीठाक झाली आहेत.

कधीकधी तुझा दादा आपल्याला सायकलवर पूलापर्यंत फिरवून आणायचा. परफ्यूमच्या फॅक्टरीजवळ जाईजुईच्या फुलांचा गंध यायचा. महानुभाव साधूंना थांबण्यासाठी एका भक्ताने नदीकाठी एक खोली बांधलेली होती. एकदा शाळा बुडवून आपण नदीकाठी मासे धरायला गेलो होतो. कोल्हापूरी बंधाऱ्यातून ओसंडून वाहणारं पाणी पाहताना डोळ्याचे पारणे फिटायचे.  कोल्हापुरी बंधाऱ्याजवळची एका रांगेत लावलेली चिंचेची झाडे तयार होऊन शाळेला जाणाऱ्या लेकरांसारखी आज्ञाधारक वाटायची.

तुमच्या घरी टिव्हीवर एका चाळणीत ईलायची ठेवलेल्या असायच्या. रामायण – महाभारत पाहण्यासाठी सगळी गल्ली तुमच्या घरी गर्दी करायची. तू कधी आमच्या घरी आलास तर आईला गूळ आणि भाकर मागायचास आणि माझी बहीण तुझ्या आईच्या हातच्या चपात्या आवडीने खायची.

माळी गुरूजी अंगकाठीने बारीक होते. आणि त्यांना तंबाखू खाण्याची सवय होती. ते गणित चुकले की, पोटाला असा चिमटा घेत की लेकरं चार ठिकाणी वाकडी व्हायची. शिंदे गुरुजींचा आवाज कडक होता. आणि स्वभावा साधा भोळा. ते जेव्हा पाढे म्हणायचे तेव्हा अख्खी शाळा दणाणून सोडायचे.

दूपारच्या सुटीत भेटणारी सुकडी खायली मजा यायची. त्यासाठी वह्याची पाने नेहमी फाडली जायची. कधी त्यांची विमाने बनायची तर कधी होड्या. पाऊस भरात आला की, शाळेची पत्रे दणक्यात वाजायची. पागोळयातून पाणी गळत राहायचे. अशावेळी तो दमदार पाऊस, वर्गात येणारे पावसाचे थेंब, अंधारून आलेले वातावरण, वर्गखोल्यातला गारवा यांच एक वेगळ जग तयार व्हायच. आणि अशावेळी मुलांचा कल्ला टिपेला पोहचायचा. सारदळलेली तंबाखू मळून मास्तर तोंडाच्या कोपऱ्यात अलगद ठेवून द्यायचे. आणि जुन्या भिजल…
आरुण सिताराम तिनगोटे-औरंगाबाद

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close