Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

विश्रांतीनगर जयभवानीनगर येथे कोरोना रक्षक दल स्थापन


औरंगाबाद /mh20live.com

कोरोना संसर्गाने बाधीत आपत्कालीन परिस्थितीत या महा आजाराने हैदोस घातला असतांना पोलीस विभाग,आरोग्य विभाग,मनपा प्रशासन व इतर हा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर(सोशल डिस्टंट)ठेवणे,मास्क चा वापर करणे,स्वच्छता पाळणे,लाँकडाऊन काळात विनाकारण घराबाहेर न पडणे असे अनेक उपाय शोधतांना प्रशासनाची दमछाक होते आहे.या करीता सामाजातील सुज्ञ नागरिकांनी पुढे येऊन प्रशासनाला सहकार्य करणे ही देवेंद्र सोळंके मुख्याध्यापक मनपा चिकलठाणा यांची संकल्पना व नियोजनासाठी पुंडलिकनगर पोलीस स्टेशनचे “पोलीस निरीक्षक”मा.घनश्याम सोनवणे साहेब,व डॉ. उढाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली  विश्रांतीनगर, जयभवानीनगर परिसरातील नागरिक यांनी “विश्रांतीनगर कोरोना रक्षक दल “स्थापन केले आहे.या कोरोना रक्षक दला मार्फत लाऊडस्पीकर वरुन जनजागृती करणे,तसेच गल्ली पातळीवर वरीलप्रमाणे नागरिकांना कोरोनासंदर्भातील माहीती देऊन “एक सुज्ञनागरिक या नात्याने”या “लोक चळवळीत”आपले योग्य योगदान देण्यासाठी प्रेरणादायी कार्य हाती घेण्यात आले आहे.या “कोरोना रक्षक दला मध्ये”मा.पोलीस निरिक्षक मा.घनश्याम सोनवणे साहेब,मा डॉ. उढाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री.देवेंद्र सोळंके यांच्या नियोजनानुसार डॉ. चव्हाण श्री.हिम्मत भैया पटेल,अर्जुन कर्नल,मंगेश वाधवानी,बाबुराव गोंड,कॉ मधूकर खिल्लारे,उमेश शेजुळ,बाबुराव कवस्कर,संदिप शिंदे,रविंद्र डिडोरे,मनी वंजारी,राकेश ठाकुर,आनंद खोडके,विजू गावडे,आप्पासाहेब साखरे,गणेश चाटे,विष्णू खांडेभराड,अमोल वंजारे,बबलू धोत्रे, हनुमान कौचट,नितिन बनकर,रमेश देवरे,संतोष बोधक,सुनिल शिंदे, व इतर हे कोरोना रक्षक म्हणून आपापल्या क्षेत्रात काम पाहतील.लवकरच वरील सर्वांना “विशेष ओळखपत्र”दिले जाईल.तसेच काही दिवसातच “कोरोना योद्धा”म्हणून मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येईल.शेवटी “कोरोनासंदर्भातील सामाजिक प्रतिज्ञा”घेण्यात आली.व मिटींग संपली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close