Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

मंठा येथील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे कर्मचारी विविध मागण्यासाठी संपावर

मंठा /अनिल बा. खंदारे mh20live Network

वीज कंपनीत कार्यरत कामगार, अभियंते, अधिकारी व कर्मचारी वीज कायदा संशोधन 2020 व केंद्र सरकारच्या ऊर्जा उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध गुरूवार दि 26 नोव्हेंबर पासून संपावर जाणार आहेत. 25 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासूनच संपावर जाण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. केंद्र सरकारने ऊर्जा क्षेत्राचे खाजगीकरण करून खाजगी भांडवलदार व कार्पोरेट घराण्यांना बहाल करण्यास्तव विज सुधारणा कायदा 2020 जाहीर केला आहे त्या धोरणाविरोधात केरळपासून जम्मू-काश्मीर पर्यंत सर्व राज्यात असलेल्या वीज कामगार अभियंते व अधिकाऱ्यांच्या सर्व संघटनांनी विविध मागण्यांसाठी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने वीज कायदा रद्द करावा, केंद्रशासित प्रदेश व ओडिसा ऊर्जा उद्योगाचे खाजगीकरण रद्द करा, असलेल्या सर्व फ्रेंचायसी रद्द करा व भविष्यात फ्रेंचायसी नियुक्ती बंद करा, सर्व कंपन्यांचे केरळ व हिमाचल राज्याप्रमाणे एकत्रीकरण करा, जुनी पेन्शन योजना लागू करा, सर्व कंत्राटी कामगारांना तेलंगणाच्या ऊर्जा उद्योगात कायम केले तसे कायम करा, ऊर्जा उद्योगातील सर्व रिक्त जागा व वरिष्ठ पदावरील भरती करा अशा विविध मागण्या संघटनांच्या वतीने करण्यात आल्या आहेत. मंठा येथील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे कर्मचारी अशोक देशमुख, सिद्धेश्वर शेळके, चंद्रकांत काळे, गणेश काकडे, नामदेव गवळी, विष्णू घनवट, कुलदीप वाघमारे, विक्रम घनवट, दत्तात्रय भोंबे, रविशंकर जईद, एकनाथ पाटील, संतोष पोळ, अनिल खरात, हर्षा उइके, ज्ञानेश्वर बोराडे आदी कर्मचारी संपावर जात आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close