Subscribe to our Newsletter
Loading
संपादकीय

मच्छिमारांचे आर्थिक स्त्रोत वाढविण्यावर भर

गेल्या चार ते पाच महिन्यापासून निसर्ग चक्रीवादळ, कोवीड संसर्गामुळे केलेली टाळेबंदी (लॉकडाऊन) आदी विविध कारणामुळे अडचणीत आलेल्या मच्छिमार बांधवाना दिलासा मिळावा, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिलो आहे. मच्छिमारांच्या मागण्या पूर्ण करणे व त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालत आहे. सामाजिक व आर्थिक दृष्ट्या कमकुवत पारंपारिक मच्छिमारांचे, मत्स्य व्यवसायिकांचे उत्पन्न दुपटीने वाढविण्यासाठी विशेष प्राधान्य देणार आहे. शाश्वत आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत व रोजगार निर्मितीच्या संधी निर्माण करणे, निर्यातीत योगदान वाढविणे यातून मच्छिमार बांधव स्वयंपूर्ण होईल यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.

मच्छिमार बांधवाच्या अडचणी दूर व्हाव्यात यासाठी मंत्रीपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर तातडीने बैठक घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. कोवीड संसर्गातून राज्य शासनाचे सावरण्याचा प्रयत्न एकीकडे सुरू असतानाच मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री म्हणून मच्छिमारांना दिलासा देण्याचे कामही केले. लॉकडाऊनमुळे तसेच या दरम्यान आलेल्या निसर्ग वादळामुळे मत्स्य व्यवसायाला मोठा फटका बसला. निसर्ग चक्रीवादळामुळे मच्छिमारांचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीत त्यांना दिलासा देणे आवश्यक होते. यासाठी रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील मच्छिमारांच्या नुकसानीची प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली. या संकट काळात राज्य शासन त्यांच्या सोबत असल्याचे सांगितले. नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना तातडीने मदत मिळण्यासाठी स्थानिक प्रशासनास व मत्स्य व्यवसाय विभागास सूचना दिल्या. मच्छीमारांना आर्थिक मदतीचे पॅकेज देणे प्रस्तावित आहे. तसेच केंद्र शासनाकडेही आर्थिक मदतीसाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.

याशिवाय ‘कोरोना’ संकटकाळात मच्छीमारांना दिलासा मिळावा, यासाठी मच्छिमारांच्या नौकांच्या डिझेलवरील मूल्यवर्धित कराच्या प्रतिपूर्ती परताव्याच्या 32 कोटीच्या रक्कमेतून राष्ट्रीय विकास निगमच्या कर्जाची वसुली न करण्याची मागणी मी वित्त विभागाकडे केली होती. वित्त विभागाने त्याला मंजुरी दिल्यामुळे मच्छिमार बांधवांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

टाळेबंदीच्या काळात सागरी मासेमारी क्षेत्रातील यांत्रिकी व बिगर यांत्रिकी नौकांचा मासेमारी परवाना, ठेक्याने दिलेल्या तलावांचा परवाना, मत्स्य बोटुकली संचयनाची आगाऊ रक्कम भरणे, पिंजरा पद्धतीने मत्स्य संवर्धनासाठी देण्यात आलेल्या ठेक्याचा परवाने तसेच कोळंबी संवर्धन प्रकल्पाचा परवाने यांचे नुतनीकरण करण्यासाठी सहा महिन्याची मुदत वाढ दिली होती. मत्स्य बीज केंद्राची चालू वर्षाची भाडेपट्टी भरण्यासही मुदतवाढ दिली आहे.

लॉकडाऊन काळात सर्वच व्यवसाय बंद झाले होते. त्याचा फटका मत्स्य व्यवसायांनाही बसला होता. त्यावर मार्ग काढून केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करून मासे, मत्स्य बीज व मत्स्य खाद्य यांना अत्यावश्यक बाबींमध्ये समाविष्ट करून घेतले. त्यामुळे त्यांच्या वाहतुकीस व विक्रीचा मार्ग मोकळा झाला.पावसाळा सुरू होण्यापूर्वी 31 मे ला मासेमारी हंगाम संपतो. त्यानंतर विविध जिल्ह्यातून तसेच इतर राज्यातून आलेले मच्छिमार/खलाशी मजूर हे आपल्या गावी जातात. मात्र लॉकडाऊनमुळे अनेक मच्छिमार, मजूर हे मुंबईत अडकून पडले होते. अशा मत्स्य व्यवसायाशी निगडीत मजुरांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून उत्तरप्रदेश व आंध्रप्रदेश मधील मच्छीमारांना गावी पाठवण्याची व्यवस्था केली.कोवीड परिस्थितीमुळे कापड उद्योगावरही संकट आले आहे. या उद्योगाला चालना मिळावी, यासाठीही विचार करत आहोत. कापड उद्योगाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी राज्य शासन नक्कीच पुढाकार घेईल, असा मला विश्वास आहे.

कोरोना संसर्गाचा सामना करत असताना मत्स्य व्यवसाय, वस्त्रोद्योग व बंदरे विकास मंत्री म्हणूनही मच्छिमार, कापड उद्योगातील कामगार यांना मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांना आर्थिक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी पुढील काळात नक्कीच प्रयत्न करू.याबरोबरच केंद्र शासनाने प्रधानमंत्री मत्स्य व्यवसाय संपदा योजनेची घोषणा केली आहें. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील मच्छिमार, मत्स्य व्यावसायिक यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीसाठी व व्यावसाय वाढीसाठी विशेष प्रयत्न करणार आहे. या योजनेचा राज्यातील जास्तीत जास्त मत्स्य व्यावसायिक व मच्छिमार बांधवांना फ़ायदा होटल, यासाठी मत्स्य व्यवसाय विभाग कार्यरत होईल याकडे लक्ष देणार आहे.

  • श्री. अस्लम शेख
  • मा. मंत्री, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास व वस्त्रोद्योग

शब्दांकन – नंदकुमार वाघमारे, सहायक संचालक (माहिती), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

0000

नंदकुमार वाघमारे
सहायक संचालक (माहिती)
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय,
मंत्रालय, मुंबई
9987452595

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close