Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, २६ जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात

ताज्या बातम्या साठी subscribers-करा,MH20LiVE बघत राहा www.mh20live.com

पुणे (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीचे निकाल रखडले असले, तरी अकरावी प्रवेशाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्यावतीने अकरावी प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार २६ जुलैपासून विद्यार्थ्यांना नोंदणी अर्ज करण्याची आणि अर्जाचा भाग एक भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे.

पुणे महापालिकेच्या क्षेत्रासह मुंबई महापालिका क्षेत्र, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रात या सुधारित वेळापत्रकानुसार अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज भरण्याचा सराव करण्यासाठी तात्पुरते प्रारुप संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे. या सुविधेमुळे विद्यार्थी आणि पालकांना अचूकपणे अर्ज भरण्यास मदत होणार आहे.

या अर्जात भरलेली माहिती २४ जुलैनंतर नष्ट करण्यात येईल. केवळ सरावासाठी १६ जुलैपासून ते २४ जुलैपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालेल. प्रत्यक्ष अर्ज भरण्यासाठी नंतर नव्याने नोंदणी करावी लागणार आहे. शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी याबाबत संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालकांना आदेश दिले आहेत.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close