Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण


सिल्लोड /विशाल जाधव

सिल्लोड : आगामी सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक  विभागाची प्रशासकीय यंत्रणा तयारीस लागली असून, सिल्लोड तालुक्यातील निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना एक दिवसाचे प्रशिक्षण नायब तहसीलदार श्री संजय सोनवणे  यांनी दिले. परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी श्रीमती पूजा पाटील,  तहसीलदार सिल्लोड श्री विक्रम राजपूत, यांच्या उपस्थितीत क्षेत्रिय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी यांना प्रत्यक्ष निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण देण्यात आले. पहिल्या प्रशिक्षण वर्गास विनापरवानगी गैरहजर असलेल्या निवडणूक कर्मचाऱ्याना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.समाधानकारक खुलासा सादर न केल्यास प्रशासकीय व फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने जारी केल्या आहेत. याप्रसंगी  नायब तहसीलदार संजय सोनवणे, विनोद करमनकर, किरण कुलकर्णी, तालुका स्तरीय विविध अधिकारी, क्षेत्रिय अधिकारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळच्या निवडणुकीत मतदान प्रक्रिया राबवताना इव्हीएम मशीन समाविष्ट करण्यात आले असून,या मशीनसंदर्भात कर्मचा-यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रत्यक्ष मशीन हाताळून प्रात्यक्षिकाद्वारे मशीनची कार्यप्रणाली समजून देण्यात आली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close