Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

वयोवृद्ध माता व मुलांची पोलिसांनी घडवून आणली भेट

-पोलिसांवर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव

-करमाड mh20live Network   स्वतःचे कुटुंब आणि मुलांपासून हरवलेल्या वयोवृद्ध महिलेस त्यांच्या मुलांची आणि आईची मुलांशी भेट घडवून आणण्याचे काम करमाड पोलिसांनी केले आहे. त्यांच्या या आई आणि मुलांच्या भेटीचे कामाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.   याबाबत अधिक माहिती अशी की,  वयोवृद्ध महिला न लोधा बाई दाजीबा सोळुंके या कऱ्होळ तालुका जिल्हा औरंगाबाद याठिकाणी आढळून आल्या होत्या. स्थानिक लोकांनी विचारपूस केल्यानंतर त्यांनी सांगितले की त्या लोहार समाजाच्या असून त्यांचे मुले फिरस्ती वर आहे नेमके कुठे गेले हे त्यांना सांगता येत नव्हते. स्थानिक लोकांनी गोलटगाव बीट  चे जमादार अविनाश चव्हाण  (पो.हे. का.249 ) यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून ही माहिती सांगितली.  अविनाश चव्हाण यांनी करमाड पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय  खेतमाळस  यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्रे फिरवली. कऱ्होळ च्या आजूबाजूच्या गावात कोणी फिरस्तिवर आहे का याचा शोध घेतला. शेकटा या गावी त्यांना कोणीतरी फिर स्तीवर असल्याचे कळाले. लगेचच अविनाश    चव्हाण यांनी शेकटा या ठिकाणी भेट देऊन खातरजमा केली तरच तेथे लोहार समाजाचे दोन लोक फिरस्ती वर आढळून आले. सदर वयोवृद्ध बाई बद्दल त्यांच्याकडे विचारणा केली असता ही त्यांची आई असल्याचे आढळून आले. सदर महिलेला चव्हाण साहेबांनी सुखरूप त्यांच्याकडे पोहोचवले. याकामी त्यांना राजू आगलावे तसेच पोलीस पाटील शेकटा यांची मदत झाली. तातडीने तपास चक्रे फिरवून आईंना त्यांच्या मुलांना मिळवून दिल्याबद्दल पोलीस निरीक्षक संजय  खेतमाळस , जमादार अविनाश चव्हाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.Attachments area

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close