Subscribe to our Newsletter
औरंगाबाद

महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण अधिनियमांची प्रभावी अंमलबावणी करा :हर्षा देशमुख

तक्रार समिती गठित करण्याचे आवाहन

                                 

औरंगाबाद: केंद्र व राज्य शासनाच्या कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळापासून संरक्षण कार्य पार पाडयासाठी जिल्हास्तरावर प्रत्येक उपजिल्हाधिकारी यांना या अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा अधिकारी म्हणून घोषित केले आहे. ज्या कार्यालयात 10 किंवा 10 पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश असेल अशा प्रत्येक नियोक्त्याने अथवा मालक यांनी कार्यालयात अंतर्गत तक्रार निवारण समिती गठीत करावी व गठीत समितीचा फलक कार्यालयाच्या, कंपनीच्या दर्शनी भागात लावावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी हर्षा देशमुख यांनी कळवले आहे.

जिल्हा अधिकारी (District officer) तथा उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) यांचे सूचनेनुसार अंतर्गत तक्रार समितीची अद्यावत माहिती पुनर्गठित (बदलीनंतरच्या ठिकाणी गेलेल्या आलेल्या कर्मचारी) त्यांच्या नावाचा त्यामध्ये उल्लेख करुन सदर समिती पदाधिकाऱ्यांची संपर्क क्रमांकासह नावे, समिती गठीत आदेश, तक्रारीचा व वार्षिक गोषवारा इत्यादी माहिती विहित नमुन्यात तत्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,औरंगाबाद या कार्यालयाचे [email protected] या ईमेल वर लवकरात लवकर पाठविण्यात यावी, असेही त्यांनी कळविले आहे.कार्यालयाचा पत्ता: प्लॉट नंबर-9, श्री. जाधव यांची इमारत , खोकडपुरा, औरंगाबाद दु.क्र. (0240) 2325068 असा आहे.

अधिनियमानुसार प्रत्येक स्थानिक प्राधिकरणे शासकीय कंपनी, सहकारी संस्था, खाजगी संस्था, सोसायटी, शैक्षणिक संस्था, मॉल, खाजगी कंपनी व इतर सर्व अधिनियमामध्ये नमूद केल्याप्रमाणे अंतर्गत तक्रार समिती गठीत करणे आणि अंतर्गत समितीचे आदेश कार्यालयाच्या कामाच्या ठळक ठिकाणी प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. अधिनियमातील तरतुदीनुसार कार्यवाही न करणाऱ्यास 50,000/- रुपये पर्यंतच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. सर्व आस्थापनावर अंतर्गत तक्रार समिती गठित करणे बंधनकारक आहे. ज्या आस्थापनावर सदर समित्या गठीत नसतील त्यांनी तत्काळ समिती गठित करावी. अन्यथा सदर आस्थापनांवर 50,000/- रुपये पर्यंतच्या दंडाची शिक्षा आकारण्याची तरतूद आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close