Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

गावकऱ्यांच्या एकजुटीने घेतलेल्या निर्णयामुळे भांबर्डा गांव कोरोनामुक्त

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

करमाड : mh20live Network

भांबर्डा (ता. औरंगाबाद) येथे कोरोनाची ५ जणांना लागण झाली होती. ग्रामीण भागात कोरोनाने डोके वर काढल्यामुळे परिसरात घबराट पसरली होती.परंतु गावकऱ्यांनी एकजुटीने कोरोनावर दहा दिवसातच नियंत्रण मिळवीले आहे.

            भांबर्डा येथील २८ वर्षीय तरुणाचा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली होती.सदर युवकाच्या संपर्कातील ४  जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे औरंगाबाद तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खळबळ उडाली होती. आपल्या गावात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसताच गावातील राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन राजकारणातील हेवेदावे बाजूला सारून एकजुटीने एकत्र येऊन शासनाच्या आदेशानुसार गावात सर्वप्रथम ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतुकीकरण करण्यात आले.नंतर संपूर्ण गावात लाऊडस्पीकरवर ग्रामस्थांना या रोगाच्या लक्षणाबाबत माहिती देऊन गावातच आपल्या घरात कुटुंबासोबत दहा दिवस होमक्वारंटाईन होण्याचे सुचना दिली.गावातील संपूर्ण व्यवहार दहा दिवस शंभर टक्के बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.गावकऱ्यांनी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन गावातील एकजुटीचे दर्शन परिसरातील इतर गावानां दिले.

कोरोनाचा प्रादुर्भाव  असल्याने कोरोना बाधित ५ रुग्णांवर प्रशाकीय कोरोना सेंटर शिवा ट्रस्ट येथे उपचार पध्दती पूर्ण झाल्यानंतर या पाच जण कोरोनामुक्त होऊन शनिवारी (दि.४)  रोजी घरी परतले आहे.  यावेळी सरपंच भीमराव साळुंके, ग्रामसेवक अनिल केंद्रेकर यांच्यासह गावकरी उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी  त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close