Subscribe to our Newsletter
Loading
शेतीविषयक

पैठण :ढाकेफळ परिसरात वादळी पाऊसामुळे उभा ऊस आडवा

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – विकास पाटील शिसोदे 


पैठण / किरण काळे ढाकेफळ परिसरात पाऊस व वादळी वार्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.कोरोना काळात सर्वच शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असुन ढाकेफळ व लोहगाव परिसर जायकवाडी बँकवाँटर क्षेञामुळे या परिसरात ऊसाचे क्षेञ मोठ्या प्रमाणावर आहे.गुरूवारी राञी झालेल्या वादळी वार्यासह जोरदार पाऊसामुळे उभा ऊस आडवा झाला.शेतकरी अधिच हवालदिल झाला असुन ऊस लागवड ते फवारणी त्याची मशागत करणे,खर्च करून शेतकरी मोकळा झाला होता.आता ऊस तोडनीसाठी शेतकर्यांनी साखर कारखान्यांना नोंदी दिल्या होत्या.आता ऊसच आडवा पडल्यामुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले असुन उंदीर व डुक्कर ऊसाची नासाडी करत आहेत.ऊस तोडणी यंञाद्वारे देखिल ऊस तोडणीला मोठी आडचन उभी राहणार आहे.त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिराऊन घेतला आहे.साखर कारखान्याने आडवा पडडलेला ऊस त्वरित ऊसतोड कामगार टोळी देऊन ऊस घेऊन जावा अशी मागणी ढाकेफळ येथिल सामाजिक कार्यकर्ते विकास पाटील शिसोदे यांनी केली आहे.याबाबत तहसिलदार पैठण यांना निवेदन देऊन ऊस पिकाचे व इतर पिकाचे झालेल्या नुकसाणीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करणार आहोत.यावेळी नामदेव लाटे,कृष्णा उघडे,दिलीप मुळे,गणेश शिंदे,अशोक गाडेकर,विलास आव्हाड,संकेत शिंदे,गोरख आदमाने,गणेश गवळी यांच्यासह आदी शेतकरी उपस्थीत होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close