Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

भांबर्डा येथे अप्पर विभागीय आयुक्त डॉ. विजयकुमार फड यांच्या हस्ते वृक्षारोपण

ताज्या बातम्या साठी subscribers करा, बघत राहा www.mh20live.com

शालेय समिती अध्यक्षांनी दोन हजार झाडे लागवड करत केली हिरवेगार

करमाड /mh20live Network – औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अप्पर विभागीय आयुक्त डॉ.विजयकुमार फड यांच्या हस्ते सोमवार दि.७ जुलै रोजी वृक्षारोपण करण्यात आले. भांबर्डा जिल्हा परिषद अध्यक्ष भीमराव पठाडे यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित केला होता. मागील वर्षी जून महिन्यात डॉ.फड यांनी या ठिकाणी भेट दिली होती; त्यादरम्यान शालेय समिती अध्यक्ष भीमराव पठाडे यांना हा शाळा परिसर झाडांनी हिरवागार दिसला पाहिजेत अशी म्हणत जबाबदारी दिली होती. त्यावेळेस पाचशे झाडे वृक्षारोपण केले होते. शालेय अध्यक्ष यांनी उन्हाळ्यात स्वतः जबाबदारी घेऊन एक हजार झाडे दररोज पाणी व मशागत करून उभी केली अप्पर विभागीय आयुक्त यांनी त्यांना या परिसरात झाडे हिरवेगार दिसला पाहिजेत असे म्हणत त्याप्रमाणे मार्गदर्शन केले होते त्याअनुषंगाने हा परिसर आज पूर्ण हिरवागार झाला आहे. शाळेच्या परीसरात दोन हजार झाडे लावली गेली आहे. यासाठी अध्यक्ष स्वतः लॉकडाऊन काळात झाडांची काळजी घेऊन जगवली आहेत. त्यांचे अप्पर विभागीय आयुक्त डॉ.फड यांनीही कौतुक केले. तसेच या अध्यक्षाचे इतर शालेय समितीच्या अध्यक्षांनी आदर्श घ्यावा असे अहवान वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी केले. यावेळी मदन घुसिंगे, सरपंच भीमराव साळुंके, उपसरपंच सुखदेव पठाडे, ग्रामसेवक अनिल केंद्रेकर, ह.भ.प.रावसाहेब फुकटे महाराज, शालेय समिती उपाध्यक्ष सोमनाथ जाधव,बळीराम अपार यांची उपस्थिती होती.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close