Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

डॉ. रविंदर सिंगल ,विशेष पोलिस महानिरीक्षक व आयर्न मॅन, यांनी यशस्वी रित्या पूर्ण केली कॉम्रेड लिजेंड वर्चुअल ९० किलोमीटर रेस

औरंगाबाद mh20live.comडॉ रविंदर कुमार सिंगल (आयर्न मॅन ) यांनी मागील काही महिन्यांपासून आपल्या राहत्या ठिकाणी खूप कष्टाचा सराव करून काल दिनांक १४ जून रोजी तब्बल ९० किलोमीटर अंतर असलेली कॉम्रेड लिजेंड वर्चुअल रेस पूर्ण करून आपल्या शहराचे नाव विश्र्वलौकिक केले ज्यामध्ये त्यांनी सोशल डीस्टनसिंग चे नियम पाळून, शहरवासीयांना एक छान आसा आरोग्य ठणठणीत कसे ठेवायचे याचा कृतिमधून संदेश दिलाय .मोठे ध्येय समोर ठेवून जर त्याचा अभ्यास सातत्याने केला तर निश्चितच यश समोरून चालून येऊन आदर भावाने आपल्या पदरी पडते . चांगली कृती करत राहणे त्यातून निर्माण होणारे सकारात्मक बदल आपल्यात आपोआप होतात तर सभोवतालचे वातावरण सुधारण्यास कारणीभूत सुद्धा ठरते व त्यातून मिळणारा आनंद हा अवर्णनीय आहे,
या शिवाय डॉ रविंदर सिंगल यांनी मागील लॉक डाऊन चे काळात विविध उपक्रमांद्वारे जनजागृती केलीय त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहेत : ज्यामधून सर्व वयोगटातील लोकांना आरोग्यविषयक तसेच सामाजिक बांधिलकी विषयक जनाजगृती केली त्यामध्ये त्यांनी लॉक डाऊन चे सगळे नियम पाळून आयर्न मॅन क्लब तर्फे आयोजित केलेले वर्चुअल चॅलेंज पूर्ण केले ज्यामध्ये ३ किलोमीटर रंनिग,४० किलोमीटर सायकलिंग आणि १० किलोमीटर रनिंग हे सर्व तीन तास चौदा मिनिटं इतक्या कमी वेळात यशस्वीरित्या पूर्ण केले.दुसरे म्हणजे त्यांनी युगांडा वर्चुअल ऑलंपिक चॅलेंज मध्ये सुद्धा सहभाग नोंदविला ज्यामध्ये त्यांनी सलग सहा तासाचे रांनिंग सायकलिंग दोन्ही अॅक्टिविटी करून एकूण भारतीय सहभागी खेळाडूंमध्ये रनर अप म्हणून स्वतःचे स्थान निश्चित केले, ज्यामध्ये त्यांनी तीन पदके मिळविली आरोग्यविषयक लोकसहभाग करून घेण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी एक फेसबुक चे मध्यामातून फिटनेस चे राजदूत ( Ambassador of Fitness ) नावाचा एक समूह सुरू केलेय ज्यामध्ये आठशे पेक्षा जास्त सर्व वयोगटातील खेळाडू सहभगी करून घेतले, त्यातील सर्व सभासद दररोज आपापल्या घरी व्यायाम करून स्वतःला सुदृढ ठेवत आहेत ,या समूहाच्या माध्यमातून मागील रविवारी एक धावण्याची स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती ज्यामध्ये तीनशे स्पर्धकांनी सहभाग नोंदविला त्यांना प्रमाणपत्र ईमेल चे माध्यमातून देऊन सन्मानित करण्यात आले ,
सामाजिक बांधिलकी मधील
एक छान उपक्रम म्हणजे डॉ.सिंगल यांनी लॉक डाऊन दरम्यान मुक्या जनावरांना पिण्यासाठी पाणी व अन्न देण्याचे उपक्रम सुद्धा राबविले आहेत या मध्ये शहरांमधील अनेक तरुणांना त्यांनी प्रोत्साहित करून मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावली, काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः त्यामधील एक साधे श्वान दत्तक घेऊन समाजाला एक प्रेमळ संदेश दिला आहे .
एकूणच आपण सर्वांनी व्यायाम करून सुदृढ राहणे व सामाजिक बांधिलकी जपणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे हा संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न आपल्या कृतीमधून केलाय.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close