Subscribe to our Newsletter
Loading
मराठवाडा

डॉ. आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शंकरनगर येथे रक्तदान शिबिरासह विविध कार्यक्रमाचे आयोजन

नरसीफाटा / शेषेराव कंधारे    

      भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज शंकरनगर ता. बिलोली येथे रक्तदान शिबिराससह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.      कोरोना महामारी नियमाचे पालन करून सामाजिक कार्यकर्ते माधवराव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली  देशासह राज्यात कोरोणा महामारी आजाराने मोठ्याप्रमाणात थैमान घातलेला असल्याने अशा या नैसर्गिक संकटात राज्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा पडत असल्याचे दिसून येत असल्याने रक्तदान हेच श्रेष्ठदान आहे म्हणून महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शंकरनगर येथे परिसरातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने महामानवाला अभिवादन करण्यासाठी म्हणून रक्तदान शिबिर व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले असून या आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे यशदाचे संचालक बबनराव जोगदंड. इतिहासाचे गाढे अभ्यासक तथा साहित्यिक राम वाघमारे . रामतीर्थ पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राम घाडगे. सामाजिक कार्यकर्ते माधवराव वाघमारे. हे यावेळी उपस्थित राहणार आहेत तरी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान या कार्यक्रमाचे संयोजक गंगाधर कांबळे.  भास्कर भेदेकर. शाहीर दीपक कांबळे. धम्मा भेदेकर सुनील कांबळे आदीसह अनेक कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close