Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

.कोविड आजारामुळे घ्याव्या लागलेल्या सुट्या नियमित कराव्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ शैक्षिक महासंघाच्या वतीने शिक्षण :–सह-संचालकांना निवेदन ..

औरंगाबाद/ mh20live Network

कोरोना विषाणूने ग्रस्त झालेल्या आणि सुट्या घ्याव्या लागलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कालावधी कुठलीही रजा न मानता नियमित करण्यासाठी शासनाने निर्णय घ्यावा अशी विनंती अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाने एका निवेदनाद्वारे राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागास केली आहे. या लढ्यात शिक्षकांनी सर्वतोपरी साथ देत आपले नियमित कार्यदेखील तितक्यात धडाडीने पार पडले आहे. परंतु दुर्दैवाने अनेक शिक्षकांना कोरोना विषाणूच्या संसर्गाची बाधा होऊन त्यांना उपचारासाठी दवाखान्यांमध्ये दाखल व्हावे लागले. त्याचप्रमाणे काहींना कोरोना बधितांच्या संपर्कात आल्यामुळे किंवा आजाराची लक्षणे आढळल्यामुळे इन्स्टिट्यूशनल तसेच होम क्वारंटाइन करण्याच्या सूचना दिल्या गेल्या. कोविड आजाराशी प्रदीर्घ लढा देऊन, या विळख्यातून सुटल्या नंतर बाहेर आलेल्या शिक्षकांना संसर्ग रोखण्यासाठी तसेच स्वास्थ्य संवर्धनासाठी काही दिवस घरी राहण्याचा वैद्यकीय सल्ला देण्यात आला. हा सर्व कालावधी अत्यंत दुर्दैवी जीवघेणा आणि त्रासदायक स्वरूपाचा होता.
अशा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संबंधित सदर कालावधीची गणना कशी करावी या संदर्भात गोंधळाची परिस्थिती राज्यभर आढळत आहे. शिक्षकांसाठी मर्यादित असलेल्या वैद्यकीय रजा यावेळी खर्ची घातल्या जात असून तशा प्रकारची मान्यता अनेक महाविद्यालयांमध्ये देण्यात येत आहे. काही ठिकाणी किरकोळ रजा म्हणून गणल्या जात आहे.
यासंदर्भात हजारो प्रकरणे राज्यभरातून समोर येत असून ही बाब गंभीर स्वरूप धारण करीत आहे. विविध ठिकाणी वेगवेगळे निर्णय घेतल्या जाऊन शिक्षकांच्या रजा संदर्भात वेगवेगळे निकष लावण्यात येत आहेत व तशा स्वरुपाच्या नोंदी घेतल्या जात आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाकडे या संदर्भात अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला असून यावर शासनाकडे दाद मागून उचित निर्देश जारी करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करावे अशी विनंती सातत्याने करण्यात आली आहे. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने विनाविलंब यासंदर्भात उचित निर्देश संबंधित विभागास देऊन महाविद्यालय स्तरावर लवकरात लवकर सूचना पोहोचतील अशा रीतीने आदेश निर्गमित करावे अशी विनंती करण्यात आली आहे.
बॉक्स
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ क्षेत्रातील संबंधित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीचा कालावधी हा नियमित स्वरूपाचा समजण्यात यावा. त्याची गणना रजा काळात करू नये. सोबतच आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार कोविड १९ आजारामधील गोपनीयतेचे संदर्भातील सुचनांच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांकडून कुठलाही रजेचा अर्ज न घेता हा कालावधी नियमित समजून अशा प्रकारच्या अनुषंगिक नोंदी घेण्यात याव्यात यासंदर्भात– औरंगाबाद विभागाचे शिक्षण सहसंचालक मा. डॉ. दिगंबर गायकवाड यांना निवेदन देताना
….अखिल भारतीय महासंघाचे शैक्षिक महासंघाचे प्रा डॉ पंढरीनाथ रोकडे .डॉ संदीपजी जगताप डॉ प्रशांतजी नेतानकर. प्राध्यापिका डॉ.महानंदा दळवी प्राध्यापिका डॉ.मीनाक्षी मुलियार.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close