Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

जाणते नव्हे तुम्ही तर विश्वासघातकी राजे; सदाभाऊंची शरद पवारांवर टीका

सांगली- येथे गुरुवारी भाजपच्या किसान आत्मनिर्भर यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी रयत संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर खरमरीत टीका केली. ‘शरद पवारांचे मनावर घेऊ नका, ते जे बोलतात त्याच्या उलटे करतात’, असे सदाभाऊ खोत म्हणाले. यावेळी भाजपचे आमदार आशिष शेलार उपस्थित होते.

यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले की, ‘शरद पवारांनी जर म्हंटले की सूर्य उद्यापासून पूर्वेकडे उगवणार, तर सूर्य पश्चिमेकडे उगवणार. पवारांचे आत्मचरित्र वाचावे की नाही असा प्रश्न पडला आहे. कारण, पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रमध्ये म्हटलंय की मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, अडत असो वा हमाली ही शेतकऱ्यांकडून घेतली नाही पाहिजे. कुणालाही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता आला पाहिजे. आता दुसरीकडे हेच पवार म्हणतात माझा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे,’ अशी टीका खोत यांनी केली. तसेच, ‘महाराष्ट्राचा इतिहास लिहला जाईल त्यावेळी पवारांना शेतकऱ्यांचा जाणता राजा नव्हे तर शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारा राजा म्हटले जाईल,’ असा घणाघातही खोत यांनी केला.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close