Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

मला दानवेंचा जावई म्हणू नका” माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा घटस्फोटासाठी अर्ज

औरंगाबाद : माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी कौटुंबिक त्रासाला कंटाळून घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. कुटुंब न्यायालयात संजना जाधव यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याची माहिती जाधवांनी दिली. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा जावई म्हणून मला कुणीही संबोधू नये, अशी विनंतीही हर्षवर्धन जाधव यांनी केली. पत्नी संजना जाधव यांच्याशी घटस्फोटाची प्रक्रिया सुरु केली असल्याचेही जाधवांनी सांगितले.कौटुंबिक त्रासाला कंटाळलो आहोत, रावसाहेब दानवे यांच्यामुळेही त्रस्त झाल्यामुळे घटस्फोटाचा निर्णय घेतल्याची माहिती हर्षवर्धन जाधव यांनी दिली. आपल्या जीवाला धोका असल्याचा पुनरुल्लेख हर्षवर्धन जाधव यांनी केला.हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत.रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघे मिळून आपल्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता. “रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे यांनी ‘हर्षवर्धन वेडा आहे’ हे सिद्ध करायचा विडा उचलला आहे. एकदा हे सिद्ध झालं तर मग तो काहीही बोलला तरी फरक पडणार नाही, असं त्यांचं षडयंत्र सुरु आहे”, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला होता.

तसेच आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी केला आहे. सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओ प्रसारित करुन दानवे यांच्यावर हे आरोप केले आहेत.रावसाहेब दानवे यांची कन्या संजना यांच्यासबोत हर्षवर्धन जाधव यांचा विवाह झाला झालेला आहे. त्यांना एक अपत्य आहे.हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून निवृत्ती घेत आपल्या पत्नीच्या हाती राजकीय सूत्र सोपवत असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. हर्षवर्धन जाधव दोन वेळा कन्नडचे आमदार राहिले आहेत. रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत खैरे दोघे मिळून आपल्याला वेडे ठरवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप हर्षवर्धन जाधव यांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
=============

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close