Subscribe to our Newsletter
Loading
राजकीय

घरात बसून एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना खातो काय?मंत्री रावसाहेब दानवेंची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका

पैठण : गेल्या चार पाच दिवसांत परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहा:कार माजवला आहे. शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही. अशात आता राज्यातील काही नेते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावा घेत. दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नसल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत. त्यामुळं सातत्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे. आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील मुख्यमंत्र्यांवर खरमरीत टीका केली आहे. मंत्री दानवे आज पैठण येथे ऐतिहासिक पालखी ओटा परिसरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते.

केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, अशी अनेक संकट येत राहतात. आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही राज्यभर फिरलो तर आम्हाला काही झालं नाही. ह्यांना एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय, अशा शब्दात दानवेंनी टीका केली

मुसळधार पावसामुळे व अतिवृष्टी झाल्या मुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान झाले.या उद्देशाने आज भारतीय जनता पार्टी व किसान मोर्चाचे जिल्हाअध्यक्ष कल्याणनाना पाटील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे केंद्रीय मंत्री तथा खा. रावसाहेब पा.दानवे,आ.हरिभाऊ बागडे ( नाना ) ( मा.विधानसभा अध्यक्ष ) व डॉ.अनिल बोंडे मा.कृषी मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष किसान मोर्चा यांच्या प्रमुख उपस्थितीत पैठण तालुका शेतकरी संवाद व अतिवृष्टी नुकसान पाहणी दौरा व जायकवाडी – खेर्डा धरणाचे जलपुजन करण्यात आले.

भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय राज्यमंत्री तथा खा.रावसाहेब पाटील दानवे हे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता आज 17 ऑक्टोबर रोजी पैठण तालुका दौर्‍यावर आले असतांना प्रथम दानवे यांच्या हस्ते संत एकनाथ महाराज यांच्या पालखी ओट्याच्या सुशोभीकरणाचे भुमीपुजन करण्यात आले.नाथसागर जलाशयाचे जलपूजन करुन त्या नंतर खेर्डा प्रकल्पाचे जलपुजन करण्यात येऊन अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या पिक नुकसानीची पहाणी करण्यात आली यावेळी केंद्रीय मंत्री दानवे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या आहे.

यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा नगराध्यक्ष सुरज लोळगे,तालुकाध्यक्ष डॉ. सुनील शिंदे,,शहराध्यक्ष चंद्रशेखर पाटील,जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण औटे,तालुका प्रवक्ते अँड कांता बापू औटे,जिल्हा उपाध्यक्ष बद्रीनारायण भुमरे, अप्पासाहेब सोलाट,तालुका सरचिटणीस विजय चाटुपळे,आबासाहेब बरकसे, भाऊसाहेब बोरुडे, बाळासाहेब माने,विजय ठाणगे,सुनील रासणे,बंडू अंधाळे, महिला प्रदेश उपाध्यक्ष रेखाताई कुलकर्णी, अश्विनी लखम,नम्रता पटेल,सुलोचना साळुंखे, जिल्हा, तालुका,शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close