Subscribe to our Newsletter
उद्योगधंदे आणि बिजिनेस

घरबसल्या केवळ 5 हजार रुपयात करा हे दोन उद्योग


नवी दिल्ली : कोरोना कालावधीत आपण आपली नोकरी गमावली असल्यास आणि पैसे कमावण्याचे इतर कोणतेही साधन नसल्यास काळजी करू नका. आपण असे दोन व्यवसाय सुरू करू शकता ज्यातून आपण घरात बसून फक्त 5 हजार रुपयांपासून लाखोंची कमाई करू शकता. पहिला व्यवसाय म्हणजे मास्क बनवणे आणि दुसरा लोणचे बनविणे. सुरुवातीला आपण हे दोन्ही उद्योगाची सुरुवात घरुन करु शकता. नंतर व्यवसायाचा विस्तार करीत आपण सरकारी योजनेद्वारे कमी व्याजदराने कर्ज देखील घेऊ शकता.

मोदी सरकार कोरोना संकटात लोकांना सतत स्वावलंबी होण्यासाठी प्रवृत्त करत आहे. कालांतराने, बदलत्या गरजांमध्ये मास्क एक महत्वाचा भाग झाला आहे. म्हणून, हा व्यवसाय बाजारात खूप यशस्वी होत आहे. यामध्ये कमी खर्चात चांगला नफा मिळू शकतो. त्याचबरोबर, भारतीय घरांमध्ये जेमणामध्ये लोणचे खाल्ले जाते. त्याचा व्यवसाय हा नेहमीच फायदेशीर असतो.

ऑनलाईन करु शकता कमाई
आजकाल बरेच लोक घरात मास्क बनवून ते विकून पैसे कमवत आहेत. त्यासाठी जास्त गुंतवणूक आवश्यक नाही. आपण फक्त 5 हजार रुपयांनी हा व्यवसाय सुरु करु शकता. यासाठी, आपल्याला फक्त शिवणकामाची मशिन, फॅब्रिक, धागा आणि इलास्टिक आवश्यक असेल. आपण इच्छित असल्यास ड्रेसला मॅचिंग मास्क बनवून देखील विकू शकता. ते खूप स्टायलिश दिसतात आणि लोकांना ते खूपच आवडतात. बाजारात देखील याला मागणी आहे. टेलरच्या दुकानातून शिल्लक असलेल्या कपड्यांची क्लिपिंग करुन आपण ते बनवू शकता. हे बनविण्यासाठी खर्च देखील कमी येतो. आपण ते थेट बाजारात विकू शकता. याशिवाय ऑनलाईन मास्क विकून देखील नफा मिळवता येतो.

फायदेशीर आहे सौदा
एका मीडिया रिपोर्टनुसार बचतगटाशी संबंधित महिलांनी मध्य प्रदेश राज्य ग्रामीण आजीविका मिशन कटनीच्या माध्यमातून मास्क बनवण्यास सुरवात केली. ज्याद्वारे त्यांनी लाखो रुपयांची कमाई केली. असे म्हटले जाते की आजीविका मिशन कटनीच्या संपूर्ण विकास गटांच्या 23 बचत गटांच्या 157 महिलांनी तयार केलेले 68365 मास्क विविध ग्रामपंचायतींमध्ये वितरीत करण्यात आले. हे मास्क 8 रूपये प्रति मास्क दराने विकल्यामुळे या गटाला 5,46,920 रुपये उत्पन्न मिळाले.

सरकारकडूनही ग्रीन सिग्नल
केंद्र सरकारच्या अॅडवायजरीमध्ये हस्तनिर्मित मास्क वापरण्यावरही भर देण्यात आला आहे. आरोग्य महानिदेशालयाच्या मते, होममेड मास्क सुरक्षात्मक कवर म्हणून वापरता येतात. कोरोना टाळण्यासाठी हे प्रभावी आहे. ते धुतले जाऊ शकते, म्हणून हे अधिक प्रभावी आहे. देशभरातील बाजारामध्ये कापडी मास्क विकण्याबरोबरच ते अनेक देशांतही निर्यात केले जात आहेत.

लोणचे आणि घरगुती स्नॅक्समधून कमवा लाखो रुपये
मीडिया रिपोर्टनुसार, गाझियाबादचा अमन जैन नावाचा माणूस हैदराबादमधील एका कंपनीत एचआर होता. लॉकडाऊनमुळे तो त्याच्या घरी परतला. येथे त्याने घरी काही व्यवसाय करण्याचा विचार केला. त्याने त्याच्या आईच्या काही रेसिपी आजमावल्या. त्याने प्रथम लोणचे तयार केले आणि त्यानंतर इतर घरगुती उत्पादने बनविली. सर्वप्रथम त्याने आपल्या मित्रांना याची टेस्ट करण्यास दिले, जे त्यांना खूप आवडले. नंतर त्याने व्हॉट्सअ‍ॅप व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्यवसायाची जाहिरात केली. सुरुवातीला त्यांना कमी ऑर्डर येत होती,मात्र नंतर त्यांना मिळणाऱ्या ऑर्डरमध्ये वाढ होत गेली. एका महिन्यात त्याने 3 लाखांपर्यंत कमाई केली. त्याचप्रमाणे आपणही या व्यवसाय कल्पनांना रोजगाराचे स्रोत बनवू शकता.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close