Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

‘मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत

मेरे देश की धरती’ चित्रपटात दिव्यांदू शर्मा हटके भूमिकेत

‘प्यार का पंचनामा’, ‘टॉयलेट एक प्रेम कथा’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांसोबत ‘मिर्झापुर’, ‘बिच्छू का खेल’ या वेबसिरीजमध्ये  झळकलेल्या दिव्यांदू शर्माने आपल्या उत्तम अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांची मने जिंकली. अल्पावधीतच आपल्या अभिनयाची छाप उमटवून हटके भूमिका साकारणारा हा अभिनेता कार्निवल मोशन पिक्चर्सच्या आगामी ‘मेरे देश की धरती’ या हिंदी चित्रपटातही एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. मॉर्डन लुक व हातात कुदळ असलेला या चित्रपटातील त्याचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. वैशाली सरवणकर यांची निर्मिती असलेला ‘मेरे देश की धरती’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा : संजय टाकळगव्हाणकर यांचे कोरोनावरील पुस्तक म्हणजे मानवी गुलामगीरीची उकलपेरणी:भ. मा. परसवाळे

दोन इंजिनिअर्स तरुण स्वत:ची नोकरी करत असताना, काहीतरी वेगळे करून दाखवण्याची उर्मी जपण्यासाठी कसे शेतकरी बनतात, ह्याची हलकी फुलकी रंजक कथा मेरे देश की धरती… देश बदल रहा है’ या चित्रपटातून उलगडणार आहे. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना दिव्यांदू सांगतो कि, ‘मला खूप अभिमान वाटतो की, मी शेतकऱ्याच्या एका वेगळ्या भूमिकेत काम करू शकलो. आज आपल्या देशात असंख्य शेतकरी खडतर मेहनत करून सुद्धा पोटभर जेऊ शकत नाहीत. हे चित्र नव्या विचारांनी बदलले जाऊ शकते त्यासाठी तरुण नेतृत्वाने पुढे येऊन काहीतरी करण्याची गरज आहे, हा संदेश देणारा हा चित्रपट आणि तशा धाटणीची माझी भूमिका रसिकांना नक्की आवडेल असा विश्वास दिव्यांदू शर्मा व्यक्त करतो. दिव्यांदू शर्मा सोबत या चित्रपटात अनंत विधात आणि अनुप्रिया गोएंका या आघाडीच्या कलाकारांसोबत ईंनाम्युलहक, ब्रिजेंद्र काला, राजेश शर्मा, अतुल श्रीवास्तव, फारुख झफर या प्रतिभावान कलाकारांच्यासुद्धा भूमिका आहेत.

मेरे देश की धरती या चित्रपटाची संकल्पना डॉ. श्रीकांत बासी यांची आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराझ हैदर यांनी केलं आहे. संवाद पियुष मिश्रा यांनी लिहिले आहेत. चित्रपटाला साजेसं संगीत विक्रम मॉण्टेरोज यांनी दिले असून छायांकन हरी वेदांतम यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन पवन आणि बॉब यांचे आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close