Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न 360 कोटींचा आराखडा मंजूर

·         वाढीव निधीतून जिल्ह्यातील गरजा पूर्ण होणार

·         मानव विकास निर्देशांक वाढीसाठी प्रयत्न

·         क्रीडा विद्यापीठ स्थापन्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न

·         160 कोटींची नवीन गुंतवणूक जिल्ह्यात होणार

औरंगाबाद, दि.25, (जिमाका) :- सन 2021-2022 या आर्थिक वर्षातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी 360 कोटींचा आराखडा मंजूर केला असून औरंगाबाद शहराच्या सर्वांगिण विकासाबरोबरच आरोग्य, शिक्षण, उद्योग त्याचप्रमाणे पर्यटन आणि मानवी विकासासंदर्भात असणाऱ्या योजनांसाठी वाढीव निधी मंजूर केला आहे. जिल्ह्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी सहकार्य आणि आत्मियतेने सर्व यंत्रणांनी काम करावे असे आवाहन पालकमंत्री सुभाष देसाई यांनी बैठकीदरम्यान केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद जिल्हा नियोजन समितीची बैठक्‍ पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार,खासदार डॉ.भागवत कराड, खासदार इम्तियाज जलील, आ. हरिभाऊ बागडे, आ. संजय शिरसाठ, आ.अतुल सावे, आ.प्रशांत बंब, आ.अंबादास दानवे, आ.रमेश बोरनारे, आ.उदयसिंग राजपूत, आ.नारायण कुचे, जिल्हा परिषद अध्यक्षा मीना शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, पोलीस अधीक्षक  मोक्षदा पाटील, महावितरणचे संचालक नरेश गिते, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष झुंझारे उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, जिल्ह्याच्या विकासासंदर्भात्‍ असलेल्या योजना यामध्ये कृषी, आरोग्य त्याचप्रमाणे शिक्षण, रस्ते विकास याबाबतच्या योजनांसाठी वाढीव निधी मंजूर केला असून पालकमंत्री या नात्याने समन्वयातुन जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता पडु दिली जाणार नाही अशी ग्वाही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री श्री.देसाई यांनी दिली.

बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मान्यवरांचे पुस्तक देऊन स्वागत केले. यानंतर महानगर पालिका आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत ‘स्मार्ट सिटीजन’ या अभियानाविषयी प्रास्ताविकात माहिती दिली. यानंतर ‘स्मार्ट सिटीजन’ या अभियानाच्या लोगोचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचे संगणकीय सादरीकरण केले. यामध्ये शिक्षण, आरोग्य, स्त्री-पुरूष प्रमाण, उद्योग, सेवाक्षेत्र, पर्यटन या बाबींचा समावेश असलेला अहवाल सादर करण्यात आला. बैठकीदरम्यान औरंगाबाद येथील क्रीडा विद्यापीठ सुरू करण्याबाबत त्याचप्रमाणे ग्रामीण रस्ते आणि पाणंद रस्ते, पैठण येथील संत विद्यापीठ, शहरातील अंतर्गत रस्ते, जिल्हा परिषद शाळांसाठी कुंपण, ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांना मान्यता, नवीन केंद्रीय विद्यालय आणि आर्मी पब्लिक स्कुल सुरू करण्या संदर्भातील विविध मागण्यांवर नियोजन करुन प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी यावेळी केल्या. यासाठी प्रशासकीय यंत्रणेच्या विविध विभागप्रमुखांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत शासनकडे प्रस्ताव सादर करावेत. या बाबींच्या पुर्ततेसाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. सर्वांच्या तळमळीणे आणि आत्मियतेने जिल्हा प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल. अशी ग्वाही पालकमंत्री श्री.देसाई यांनी बैठकीच्या समारोप प्रसंगी दिली. यानंतर सभागृहातच जलजीवन मिशन आराखड्याचे सादरीकरण जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता श्री.घुगे यांनी सादर केले. आज राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्याने जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्वांनी जागरुक मतदार व नागरिक म्हणून प्रतीज्ञा घेतली.

सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 मधील डिसेंबर,2020 अखेरच्या खर्चाचा आढावा.

 (रु.कोटीत)

वर्षअर्थसंकल्पित नियतव्ययप्राप्त निधीआजपर्यंतची प्रशासकीय मान्यता रक्कमआजपर्यंत वितरीत निधीप्राप्त निधीशी प्रशासकीय मान्यतेचीटक्केवारी
2020-21325.50325.5088.2957.6327.12%

·         शासनाचे निर्देशाप्रमाणे सन 2020-21 मध्ये एकूण नियतव्ययाच्या 16.50% निधी कोविड (COVID – 19) या जिवाणू मुळे पसरणा-या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखणे व प्रतिबंध करण्यासाठी रु.53.71 कोटी उपलबधअसुन रु.53.68 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

·         विशेष घटक योजना (SCP) व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उपयोजना (OTSP) – 2020-21

 (रु.कोटीत)

अ.क्र.विकास क्षेत्राचे नांवसन 2020-21
मंजूर अर्थसंकल्पीय नियतव्ययमाहे डिसेंबर – 2020 अखेर झालेला खर्च
1आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजना (OTSP)7.660.00
2विशेष घटक योजना (SCP)103.240.00

·             

·        जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2021-22 प्रारुप आराखडयास  मान्यता.

प्रस्तावीत आराखडा – 2021-22

अ.क्र.योजनारु.265.68 कोटीमर्यादेत (रु.लाखात)रु.360.00 कोटीच्या प्रस्तावीत वाढीवनुसार (रु.लाखात)
1नाविण्यपूर्ण योजना (3.5%)929.881260.00
2मुल्यमापन, संनियंत्रण व डेटाएन्ट्री (0.5%)132.84180.00
3शाश्वत विकास ध्येये (Sustainable Development Goals) (1.00%)265.68360.00
4जिल्हा नियोजन समिती बळकटीकरण15.2615.26
5तातडीच्या उपाययोजना2.002.00
6उर्वरीत निधी (गाभा व बिगर गाभा क्षेत्रासाठी)25222.3434182.74
 पैकी गाभा क्षेत्रासाठी (2/3)16814.8922788.49
 बिगर गाभा क्षेत्रासाठी (1/3)8407.4511394.25
एकूण आराखडा :26568.0036000.00

जिल्हावार्षिकयोजना(सर्वसाधारण)सन2021-22

ठळकबाबी

Ø   सन 2021-22 ची वित्तिय मर्यादा रु.265.68 कोटी

Ø   यंत्रणांची एकूण मागणी रु.600.06 कोटी

Ø   प्रस्तावीत वाढीव आराखडा रु.360.00 कोटी

Ø   सन 2021-22 च्या प्राप्त वित्तिय मर्यादेनुसार वाढीव मागणी रु.94.32 कोटी

जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (OTSP) प्रारुपआराखडा मान्यता

(रु.लाखात)

शिर्षयंत्रणांची मागणीरु.7.66 कोटी वित्तीय मर्यादेनुसारअतिरिक्त मागणी
1. गाभा क्षेत्र योजना630.51284.04346.47
2. गाभाक्षेत्र योजना131.0167.1263.89
3. मागासवर्गीयांचे कल्याण (विशेष क्षेत्र)451.01396.0155.00
4. नाविन्य पुर्ण योजना15.3315.330.00
4. मुल्यमापन, संनियत्रण  व उपयोगितातपासणी3.833.830.00

जिल्हा वार्षिक योजना सन 2021-22 विशेष घटक योजना (SCP) प्रारुप आराखडयास  मान्यता                                                                                                                                      

(रु.लाखात)

शिर्षयंत्रणांचीमागणीरु.103.24 कोटी वित्तीय मर्यादेनुसारअतिरिक्त मागणी
1. कृषी व संलग्नसेवा1619.001619.000.00
2. ग्रामीणविकास0.000.000.00
3. पाटबंधारे व पुरनियंत्रण0.000.000.00
4. विदयुतविकास2500.001600.00900.00
5. उदयोग व खाणकाम62.0047.0015.00
6. वाहतुक व दळणवळण0.000.000.00
7. सर्वसाधारणआर्थिकसेवा0.000.000.00
8. सामाजिक व सामुहिकसेवा7439.406748.28691.12
9. वैशिष्टपुर्णयोजनांसाठीराखुनठेवावयाचा 3 % निधी309.72309.720.00
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close