Subscribe to our Newsletter
Loading
उद्योगधंदे आणि बिजिनेस

ऑराने लाँच केले मिलेनिअल्ससाठी नवीन आकर्षक कलेक्शन

दिशा पटानीला ऑराची पहिली ब्रॅण्ड अँबॅसडर म्हणून घेत आणले आहे ‘डिझायर्ड

१०० हून अधिक नवीन स्टाइल्ससह डिझायर्ड कलेक्शन प्रथमच आणत आहे १४ कॅरट सोन्यातील हिऱ्यांच्या व सोन्याच्या इयररिंग्ज व अंगठ्या~

मुंबई:ऑरा या भारतातील आघाडीच्या व विश्वासाच्या डायमंड ज्वेलरी ब्रॅण्डने डिझायर्ड हे मिलेनिअल्सना डोळ्यापुढे ठेवून तयार केलेले कलेक्शन सर्वांपुढे आणून आपल्या पोर्टफोलिओमध्ये नवीन विभागाची भर घातली आहे. डिझायर्ड लाँच करून ऑराने आपल्या समकालीन अलंकारांचा विस्तार तरुण स्त्री ग्राहकांच्या वाढत्या वर्गापर्यंत नेला आहे. या महत्त्वपूर्ण लाँचच्या निमित्ताने ऑराची ब्रॅण्ड अँबॅसडर म्हणून दिशा पटानीच्या नावाची घोषणाही करण्यात आली आहे.

लॉकडाउनच्या काळातही ऑराचा ग्राहकवर्ग ब्रॅण्डप्रती निष्ठा राखून होता. तरुणांच्या वाढत्या विभागाकडे लक्ष केंद्रित करून २०२१ मध्‍ये सकारात्मक वाढ साध्य करण्याचे उद्दिष्ट ब्रॅण्डपुढे आहे. अलंकार हा आपल्या व्यक्तिमत्वाचा विस्तार आहे तसेच फॅशन स्टेटमेंट आहे असा विचार करणाऱ्या फॅशनबाबत जागरूक अशा आधुनिक स्त्रियांना डोळ्यापुढे ठेवून डिझायर्ड हे कलेक्शन डिझाइन करण्यात आले आहे. टोकदार आणि वैविध्यपूर्ण दागिन्यांचे हे कलेक्शन रोझ गोल्ड आणि हिऱ्यांमध्ये घडवण्यात आले असून, त्यात १०० हून अधिक शैली उपलब्ध आहेत. हे कलेक्शन १४ कॅरेट सोन्यामध्ये तयार करण्यात आले असून, यात कानातली व अंगठ्यांचा समावेश आहे. ऑराने हा उत्पादन विभाग प्रथमच सर्वांपुढे आणला आहे.

डिझायर्ड या कलेक्शनचे लाँचिंग तसेच ब्रॅण्ड अँबॅसडरच्या घोषणेबाबत ऑराचे व्यवस्थापकीय संचालक श्रीदीपू मेहता सांगतात, “डिझाइनमधील आघाडी व उत्पादनातील नावीन्य यांचा पाया ऑराने घातलेला असल्याने आमचा समकालीन दागिन्यांचा विभाग आणखी विस्तारणे आमच्यासाठी साहजिकच होते. आम्ही मिलेनिअल ग्राहकांच्या वाढत्या वर्गाशी संवाद साधत आहोत. या वयाच्या स्त्रिया जे काही करतील, त्यांत त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब दिसून येते. त्यांचे कपडेही त्यांच्या व्यक्तिमत्वावरून ठरतात. ही सर्व अंगे आणि या पलीकडीलही काही घटक आमच्या डिझायर्ड या नवीन कलेक्शनमध्ये आले आहेत. डिझायर्डच्या महत्त्वपूर्ण लाँचिंगला आमच्या ब्रॅण्ड अँबॅसडरपदी दिशा पटानीच्या नियुक्तीची जोड देण्यात आली आहे. दिशा पटानीला ऑराचा चेहरा म्हणून सर्वांपुढे आणताना ऑराला खूप आनंद होत आहे. दिशा या कलेक्शनसाठी चपखल पसंती आहे, कारण ती आजच्या वैशिष्ट्यपूर्ण स्त्रीचे प्रतिनिधित्व करते. वैशिष्ट्यपूर्ण शैली, प्रगतीशीलता आणि आपल्या उद्दिष्टाच्या दिशेने जाण्याचे धैर्य हे सगळे दिशामध्येही आपण बघू शकतो.”

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close