Subscribe to our Newsletter
मराठवाडा

उस्मानाबाद:लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवेतील सूट दिलेल्या बाबींना सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंतच सुरु ठेवण्यास परवानगी

*कोरोनाची वाढती रुग्ण संख्या व अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली

होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणासाठी प्रशासनाचा निर्णय .

या निर्णयांची तात्काळ अंमलबजावणी :कौस्तुभ दिवेगावकर

उस्मानाबाद,दि.16: कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चैन अंतर्गत दि.14 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजेपासून दि.01 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत करावयाच्या कार्यवाही बाबत दिेलेल्या मार्गदर्शन सूचना लागू करण्यात आल्या आहेत.या कालावधीसाठी संचारबंदी लागू करण्यात आली असतानाही अत्यावश्यक सेवांबरोबर सूट देण्यात देण्यात आलेल्या बाबींच्या कारणांसाठी नागरिक घराबाहेर पडून संचारबंदीचे उल्लंघन करत असल्याने वैद्यकीय सेवा,सार्वजनिक वाहतूक,पाणी पुरवठा,एटीएम,विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा आदीच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यत सुरु राहतील,उर्वरित अत्यावश्यक सेवा आणि सुट देण्यात आलेल्या बाबीं सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंतच सुरु राहतील,असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी आज येथे जारी केले आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या दालनात आज सकाळी तातडीने बोलावण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.शहरातील आणि जिल्हयातील कोरोनाच्या संसर्गाने वाढणाऱ्या रुग्णांची संख्या आणि जिल्हयात अत्यावश्यक सेवांच्या नावाखाली घराबाहेर पडून नागरिक करत असलेली गर्दी यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.या बैठकीस जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,उस्मानाबादचे तहसीलदरा गणेश माळी,होम डी वाय एसपी एस.एस. बाबर आदी उपस्थित होते.

   

सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 नुसार संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. या कालावधीत 14 एप्रिल 2021 च्या आदेशा नुसार अत्यावश्यक सेवांकरिता संचारबंदीतून सूट देण्यात आली आहे व सूट देण्यात आलेल्या बाबींकरिता सकाळी 7 ते रात्री 8 या वेळेत होणारी हालचाल वगळता कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी संचार करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. त्यामुळे नागरिकांनी केवळ अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडणे अपेक्षित आहे. तथापि,असे निदर्शनास आले आहे की, जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी नागरिक अत्यावश्यक सेवांबरोबरच सूट देण्यात आलेल्या बाबींचे कारण सांगून मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत.आणि गर्दी करत आहेत.त्यातून संचारबंदीचे उल्लंघन करित असल्याचे दिसून येत आहे.

सद्यस्थितीत उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-19 च्या रुग्णसंख्येत दररोज सातत्याने वाढ होत आहे.त्यातच नागरिकांकडून विनाकारण संचारबंदीचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येत असल्यामुळे कोव्हिड 19 या विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तात्काळ अधिकच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे व आणखी कडक निर्बंध लागू करणे अत्यावश्यक असल्याची खात्री झाली आहे.असे नमूद करुन जिल्हाधिकारी श्री.दिवेगावकर यांनी या आदेशात 14 मार्च 2021 च्या आदेशा प्रमाणे आणि फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतुदींनुसार त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील करोना विषाणु (COVID-19) चा प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात दि. 16 एप्रिल 2021 ते दि.01 मे 2021 रोजी सकाळी 7 पर्यंत कालावधीत पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्याबाबत आदेशित करीत आहे,असे म्हटले आहे.

दि.14 एप्रिल-2021 ज्याच्या आदेशात अत्यावश्यक सेवांपैकी (Essential Services) फक्त पुढे नमूद अत्यावश्यक सेवा (Essential Services) पूर्ण वेळ सुरु राहतील.त्यात दवाखाने, रोगनिदान केंद्रे, चिकित्सालये, लसीकरण केंद्रे, वैद्यकीय विमा कार्यालये, औषधालये, औषध कंपन्या, चष्मा दुकाने, इतर वैद्यकीय व आरोग्य सेवा आणि त्यांची उत्पादन व वितरणासाठी सहाय्यक सर्व घटक जसे कार्यालये, वाहतूक, पुरवठा साखळी. लसींचे उत्पादन व वितरण, सॅनिटायझर्स, मास्क, वैद्यकीय साधनसामुग्री, त्यांची उपकरणे, कच्च्या मालाचे व सहाय्यक सुविधांचे घटक.सार्वजनिक वाहतूक : विमाने, रेल्वे, टॅक्सी, ॲटोरिक्षा व सार्वजनिक बसेस.मालवाहतूक,पाणीपुरवठा सेवा (या सेवेसाठी काम करणा-या कर्मचा-यांनी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक),पेट्रोल पंप,यात उस्मानाबाद शहरातील पोलीस वेलफेअर पेट्रोल पंप आणि जिल्ह्यातील सर्व न.प./न.पा./न.पं. यांची हद्द जेथे संपते तेथून पुढे 10 कि.मी. अंतराच्या पुढील भागात असणारे व केवळ राष्ट्रीय महामार्ग/राज्य महामार्गावर असणारे पेट्रोल पंप पूर्ण वेळ सुरु राहतील.जिल्ह्यातील सर्व न.प/न.पा./न.पं. हद्दीच्या क्षेत्रात व हद्दीबाहेर 10 कि.मी. अंतराचे आतील भागात असणारे सर्व पेट्रोल पंप सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेतच चालू राहतील.एटीएम(ATM’s ),विद्युत व गॅस सिलेंडर पुरवठा (या सेवेसाठी काम करणा-या कर्मचा-यांनी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक).

राज्य शासनाने दि.13 एप्रिल-2021आणि जिल्हा प्रशासनाने दि.14 एप्रिल 2021 रोजी काढलेल्या आदेशात नमूद सूट देण्यात आलेल्या बाबीं (Exemption Category) पैकी फक्त पुढील नमूद बाबी पूर्ण वेळ सुरु राहतील.खाजगी बसेस सह खाजगी अत्यावश्यक सेवांकरिता वाहतूक करण्याची पूर्ण वेळ परवानगी राहील. राज्य शासनाने दि.13 मार्च 2020 आणि दि.14 मार्च 2020 नमूद केलेल्या अत्यावश्यक सेवा व सूट देण्यात आलेल्या बाबी वगळता दि.14 एप्रिल 2021 रोजीच्या मूळ आदेशातील नमूद उर्वरित सर्व अत्यावश्यक सेवा आणि सूट देण्यात आलेल्या बाबी सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत चालू राहतील.


  
Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close