Subscribe to our Newsletter
Loading
कोरोंना अपडेटमराठवाडा

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण 16 पॉझिटीव्ह, पैकी 4 रुग्णांना डिस्चार्ज

जिल्ह्यात एकूण 16 पॉझिटीव्ह, पैकी 4 रुग्णांना डिस्चार्ज

      उस्मानाबाद,/mh20live Network

दि.20(जिमाका) :- जिल्हा सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून आजतागायत एकुण 941 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यामध्ये उस्मानाबाद तालुक्यातील 190 , तुळजापूर 186, उमरगा 218, लोहारा 68, कळंब 166, वाशी 11, भूम 36, परंडा 66 व्यक्तींचा समावेश  आहे. त्यापैकी 807 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून 31 व्यक्तीचा अहवाल (Rejected) आला आहे. तसेच 88 व्यक्तींचे अहवाल हे अप्राप्त आहेत. आज दि.20 मे 2020 पर्यंत एकुण 16 कोविड पॉझिटिव्ह रुग्ण उस्मानाबाद जिल्हयात आढळुन आले. त्यापैकी 4 रुग्णांची प्रकृती चांगली असल्यामुळे उमरगा तालुक्यातील 3 व परंडा तालुक्यातील 1 रुग्णांना  रुग्णालयातुन रोगमुक्त (डिस्चार्ज) करण्यात आले.  सद्यस्थितीमध्ये एकुण कोविड पॉजिटिव्ह रुग्ण 12 असुन ते पुढीलप्रमाणे रुग्णालयात उपचार घेत आहेत. कंळंब येथील एका रुग्णाची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना वैद्यकिय महाविद्यालयात सोलापुर येथे पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे . तसेच उपजिल्हा रुग्णालय तुळजापुर येथे 2, उपजिल्हा रुग्णालय परंडा 4, उपजिल्हा रुग्णालय कळंब 4 व जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद येथे 1 असे एकुण 12 कोविड पॉजिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.  सध्या त्यांची प्रकृती चांगली असुन मृत्यु निरंक आहे,  अशी माहिती  उस्मानाबादचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आर.व्ही. गलांडे यांनी दिली आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close