Subscribe to our Newsletter
Loading
क्रीडा व मनोरंजन

हंगामा प्लेच्या लव का पंगा या आगामी शोच्या सेटवर आशा नेगीने अंश बागरीच्या कानशिलात लगावली का?

अंश बागरीने दिले स्पष्टीकरण

: हंगामा प्लेच्या लव का पंगा या आगामी ओरिजनल रोमँटिक शोमध्ये टीव्ही अभिनेत्री आशा नेगी एका शहरी आधुनिक तरुणीची भूमिका बजावणार आहे. तिच्यासोबत अंश बागरी या शोमध्ये दिसेल. आधुनिक काळातील प्रेमाची कथा असलेल्या या शोमध्ये अंशने सुमीत या हरयाणवी देसी छोरा साकारला आहे तर आशा नेगीने दिल्लीतील आधुनिक नेहा या तरुणीची भूमिका साकारली आहे. मनालीच्या निसर्गरम्य परिसरात चित्रित या कथेत दोन तरुण व्यक्तिरेखा योगायोगाने घडणाऱ्या घटनांमुळे कुणी कल्पनाही करणार नाही, अशा पद्धतीने एकमेकांच्या आयुष्यात येतात. या शोचे चित्रिकरण प्रत्येकासाठीच फार छान अनुभव असला तरी अंश बागरीला एक वेगळाच प्रसंग लक्षात राहिलाय. आशा नेगीने चुकून त्याला अपेक्षेपेक्षा अधिक जोराने मारले होते.

या प्रसंगाबद्दल अंश बागरी म्हणाला, “होएक प्रसंग असा आहे ज्यात आम्ही दोघांनीही मद्यपान केले आहे आणि आपापल्या घरी जाताना आमचे पाय लटपटताहेतमात्रचुकून तोल जातो आणि सुमीत म्हणजे मी नेहावर पडतो आणि ती चटकन मला कानाखाली मारतेपणमला वाटतं आशा फारच भूमिकेत शिरली आणि तिने अपेक्षेपेक्षा अधिकच जोराने माझ्या कानाखाली मारलीक्षणभरातच तिच्या लक्षात आलं काय झालं ते आणि आपली चूक झाली हे मान्य करून ती लगेच माफी मागू लागली. खरंतर हा प्रसंग इतका विनोदी होता आणि आताही आम्ही सगळे त्यावर हसतोहे मला छान वाटतं.

अब्युझ ओरिजनल निर्मित आणि नितेश सिंग दिग्दर्शित लव का पंगा 15 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होईल आणि हंगामा प्ले आणि भागीदार नेटवर्क्सवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध असेल.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close