Subscribe to our Newsletter
Loading
आरोग्य व शिक्षण

डर्मा हील :त्वचेच्या रोगांसाठी होमियोपॅथी आणि लाईट थेरपी यांचे मिश्रण असलेला उपचार

पुणे : प्रत्येक रुग्णाला प्रतिबंधात्मक आणि प्रभावी आरोग्य उपचार पुरवण्याचा प्रयत्न करताना डॉ. बात्रा यांनी वैज्ञानिक, अचूक, सुरक्षित आणि अद्वितीय अशा पद्धतीने योजलेल्या उपचारांच्या आधाराने होमियोपॅथीचे भविष्य क्रांतिकारी बनवले आहे. आपल्या नवीन सेवेच्या अंतर्गत डॉ. बात्रा सादर करत आहेत डर्मा हील, त्वचारोगाच्या रुग्णांसाठी अशा प्रकारचा पहिलाच, सोपा आणि वेदनामुक्त उपाय.

डर्मा हील – एक क्रांतिकारी त्वचारोग उपाय, ज्यामध्ये त्वचा रोगसाठी यूव्हीबी प्रकाशकिरणांचे सत्व आणि होमियोपॅथी यांचे सुरक्षित आणि नैसर्गिकरीत्या मिश्रण केले जाते. प्रत्येक डर्मा हील सेशनसाठी फक्त 30 मिनिटे लागतात आणि योग्य होम्योपैथिक त्वचा विशेषज्ञ च्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षित उपचारकर्ते हा उपचार करतात. 400 पेक्षा जास्त वैद्यकीय संशोधनाच्या अहवालांमध्ये या उपचाराचा प्रभावीपणा सिद्ध झाला आहे, आणि त्वचेवरील उपचारांचे परिणाम ही ट्रीटमेंट अधिक चांगले करते ज्यामुळे तुम्हाला फक्त 5 आठवड्यांत त्वचेच्या स्थितीत सुधार झालेला दिसून येतो. 

डर्मा हील नॅरोबँड यूव्हीबी फोटोथेरपीचा वापर करते. “नॅरोबँड” म्हणजे अल्ट्रावायलेट (यूव्ही) रेडिएशनची एक विशिष्ट वेव्हलेन्थ, जी 311 ते 312 nm एवढी असते.  सोरायसिस, विटिलगो, एटोपिक एक्जिमा    , कोंडा, डैंड्रफ, खुजली  आणि लाइकेन प्लेनस  या आणि यासारख्या इतर त्वचेच्या समस्यांवर उपाय करण्यासाठी यूव्ही रेडिएशनची ही रेंज सर्वात फायदेशीर घटक म्हणून सिद्ध झाली आहे.

डर्मा हीलच्या लाँच वर बोलताना डॉ. अक्षय बात्रा, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, डॉ. बात्राज ग्रूप ऑफ कंपनीज आणि फेलो ऑफ होमीयोपॅथीक डर्माटॉलॉजी (महाराष्ट्रा युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस (एमयूएचएस)); म्हणाले, “रुग्णाला सर्वात प्रथम प्राधान्य देण्याचे आमचे तत्वज्ञान आहे, आणि म्हणून उपचारांचे अधिक चांगले परिणाम लाभावेत म्हणून आम्ही आमच्या रुग्णांना अद्ययावत वैद्यकीय नावीन्यपूर्ण उपचार पुरवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. डर्मा हीलच्या साहाय्याने, इतर नेहमीच्या उपचारपद्धतींच्या 60% परिणामांच्या तुलनेत 96% पर्यंत परिणाम वाढवावेत असे आमचे ध्येय आहे.

ते पुढे म्हणाले, “त्वचा रोगांमुळे फक्त शरीरावरच व्रण पडतात असे नाही तर त्वचारोग सहजगत्या दिसून येत असल्याने त्याचा रुग्णाच्या स्वाभिमानावर आणि आत्मविश्वासावर देखील वाईट परिणाम होतो. त्वचारोगाचे बरेचसे रुग्ण असे उपचार करतात ज्याचा काहीवेळा उलट परिणाम होतो. डर्मा हील हा असा उपचार आहे जो फक्त वेदनामुक्तच नाही तर त्याचे परिणाम लवकर दिसून येतात आणि त्याचे इतर काही साईड इफेक्ट्स सुद्धा नाहीत.”

यूव्हीबी लाईट आणि होमियोपॅथी यांचे गुणधर्म, यांच्या साहाय्याने पुढील रोगांमध्ये चांगला परिणाम दिसून आला आहे:

·         व्हिटीलीगो: नॅरोबँड यूव्हीबी फोटोथेरपी निष्क्रिय स्किन मेलॅनोसाईट्सना चालना देते आणि क्युटेनिअस (त्वचेशी निगडित) रोगप्रतिकारशक्ती सुद्धा नियंत्रित करते आणि त्यामुळे त्वचा एकसारखी नितळ होऊन त्वचेचा नैसर्गिक रंग तिला पुन्हा प्राप्त होतो

·         सोरायसिस: या फोटोथेरपी पद्धतीने अल्ट्रावायलेट (यूव्ही) लाईट त्वचेचा जाडपणा, लालसरपणा आणि त्वचेचे पापुद्रे निघणे या गोष्टी कमी होतात तसेच नवीन त्वचापेशींचे निर्माण मंदावते

·         एक्झेमा: डर्मा हील थेरपीमुळे त्वचेचा दाह थांबतो आणि पेशींच्या विभाजनावर प्रभाव पडत असल्याने खाज येणे आणि त्वचा जाड होणे या गोष्टी कमी होतातकोंडा: इतर उपचारांना दाद न देणारा खूप जास्त प्रमाणातील कोंडा असेल तर यूव्हीबी लाईट ट्रीटमेंटमुळे या कोंड्यामुळे येणारी खूप जास्त खाज आणि पापुद्रे निघणे या गोष्टी सुरक्षित आणि प्रभावी पद्धतीने कमी होतात

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close