Subscribe to our Newsletter
Loading
औरंगाबाद

सार्वजनिक जागेवरील अतिक्रमण पाडण्याचे उपायुक्तांचे आश्वासन ० तिरुपती विहारवासीयांना दिलासा

औरंगाबाद/प्रतिनिधी गारखेडा परिसरातील तिरुपती विहारच्या सार्वजनिक मोकळ्या जागेवर केलेले अतिक्रमण पाडून २६ सदनिकांमधील रहिवाशांची समस्या सोडविण्याची मागणी शुक्रवारी २५ सप्टेंबर रोजी नागरिकांच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे उपायुक्त रवींद्र निकम यांच्याकडे केली आहे. याप्रकरणी विनाविलंब लक्ष घालून अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन उपायुक्त रवींद्र निकम यांनी शिष्टमंडळाला दिले आहे. ० पार्किंगला गटारीचे स्वरूप निवेदनात म्हटले आहे की, गारखेडा परिसरातील सिटी सर्वे क्रमांक २५८४० मध्ये तिरुपती विहार सोसायटी आहे. सी बिल्डिंगमधील बी-१ क्रमांकाच्या सदनिकेत राहणारे सदाशिव मारावार यांनी सोसायटीच्या सार्वजनिक खुल्या जागेवर आपल्या सदनिकेभोवती सिमेंट काँक्रिटचे बांधकाम करून ओटा बांधला आहे. तसेच खुल्या जागेमध्ये बागही फुलवली आहे. पक्के बांधकाम केल्यामुळे पावसाचे पाणी तुंबून पार्किंगला गटारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. २६ सदनिकांमधील नागरिकांची दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या सायलेन्सरमध्ये पावसाचे पाणी आणि गाळ जावून वाहने नादुरूस्त होत आहेत. पार्किंगमध्ये घाण पाणी, कचरा आणि गाळ साचल्यामुळे तिरुपती विहार परिसराला नाली- गटारीचे स्वरूप प्राप्त झाले असून डासांची उत्पत्ती होत आहे. तसेच पार्किंगमध्ये पाय घसरून पडून वृद्ध आणि लहान मुले जखमी होत आहेत. सध्या कोरोना महामारीची साथ सुरू असल्यामुळे तिरुपती विहारमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ग्राउंड फ्लोअर वरील सार्वजनिक मोकळ्या जागेवरील केलेले अतिक्रमण पाडल्यास पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्ग मोकळा होईल आणि पार्किंगमध्ये पाणी तुंबणार नाही. गेल्या दोन वर्षांपासून मारावार यांनी अतिक्रमण करून बांधकाम केल्यामुळे पार्किंगला नाल्याचे स्वरूप आले आहे. परिणामी येथील नागरिक विविध समस्यांना तोंड देत आहेत. याप्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून लक्ष घालून अतिक्रमण हटविण्याची आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. उपायुक्त रवींद्र निकम यांनी अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले. निवेदनाची प्रत प्रभाग “फ” चे प्रभारी अधिकारी यांनाही देण्यात आली आहे. शिष्टमंडळात प्रा. संतोष भोपळे, अभय सोभावणे अनिल निकुंभ, प्रदीप माहुरकर, बी. पी. पाटील, इंजि. कैलास शर्मा, अरविंद मिसाळ, डॉ. शेषराव पठाडे, चंद्रकांत शिरवळकर, श्री. भारती आदींचा समावेश होता.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close