Subscribe to our Newsletter
Loading
करिअर

महाडिबीटीव्दारे अर्ज करण्याचे दिव्यांग विद्यार्थ्यांना समाज कल्याण विभागाचे आवाहन

            अलिबाग,जि.रायगड,दि.27 :- जिल्हयामध्ये शालांत परिक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये रक्कम थेट जमा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार http://mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर शालांत परीक्षोत्तर (मॅट्रिकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेण्यासाठी अर्ज करता येणार आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यानी डीबीटी पोर्टलव्दारे अर्ज भरून संबंधित महाविद्यालयाकडे पाठवावेत, असे आवाहन जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाने  केले आहे.

            संबंधित महाविद्यालयाने प्राप्त अर्जाची पडताळणी करून प्राप्त झालेले अर्ज जि.प.च्या समाज कल्याण कार्यालयाकडे सादर करावेत. प्राप्त झालेल्या अर्जदारास इयत्ता दहावी नंतर  महाविद्यालयीन, व्यावसायिक, तांत्रिक व अभियांत्रिकी शिक्षणासाठी त्यांच्या अभ्याक्रमांच्या दर्जाप्रमाणे अभ्यासक्रमांचे गट करून दरमहा शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये देण्यात येते.

        त्याचबरोबर अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता, दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीबरोबर शैक्षणिक शुल्क, प्रकल्प टंकलेखन खर्च, अभ्यास दौरा खर्चाची रक्कम दिली जाते.(अकरावी, बारावी, प्रथम वर्ष 230 रूपये दरमहा, व्दितीय व तृतीय वर्ष 300 रुपये दरमहा एम.ए.व इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी 530 रुपये दरमहा दिले जातात.

        या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांग विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेमार्फत/कॉलेजमार्फत अर्ज महाडीबीटी पोर्टल व्दारे जिल्हा परिषद समाज कल्याण कार्यालयाकडे जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडील दिव्यांगत्व 40 टक्के पेक्षा जास्त अपंगत्व असलेले प्रमाणपत्र, मागील वर्षाचे गुणपत्रक, बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्रांसह ऑनलाईन सादर करावे, असेही आवाहन समाज कल्याण विभागाने केले आहे.

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
Close
Close