Subscribe to our Newsletter
औरंगाबाद

अपघातग्रस्तांना मदतीचे मृत्युंजय यांना दाखविले प्रात्यक्षीके

महामार्ग पोलीसांचा खुलताबाद येथे उपक्रम

खुलताबाद -सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील अपघातग्रस्त वाहणातील प्रवाशांना तात्काळ मदत मिळून त्यांचा जीव कसा वाचवता येईल यासाठी महामार्ग पोलीसांच्या वतीने मृत्युंजय यांना विविध प्रात्यक्षीके करून दाखवत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.    दिनांक १८ एप्रिल रोजी दहा ते बारा  वाजेच्या दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील प्राथमिक आरोग्य केंद्र खुलताबाद  येथे  डॉ  भूषणकुमार उपाध्याय अप्पर पोलीस महासंचालक  मुंबई यांच्या संकल्पनेतू संजय जाधव पोलीस अधीक्षक महामार्ग पोलीस पुणे ,  प्रीतमकुंमा यावलकर पोलीस उप अधीक्षक महामार्ग  पुणे व श्रीमती नंदीनी चांपुरकर मॅडम औरंगाबाद  यांच्या; मार्गदर्शनाखाली दिनांक १८ एप्रिल रोजी दहा ते बारा  वाजेदरम्यान  वैद्यकिय अधिकारी डॉ किरण शिंदे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ  मुजीब शेख , दंत रोग तज्ञ   श्रीमती वंदना गायसमुदरे  , वैद्यकीय अधिकारी खुलताबाद यांनी उपस्थित  सात मृत्युंजय दूत जगन्नाथ सांडू जाधव (ममनापूर ), युवराज जाधव ( कातशेवरी) , अशोक आधाने (गदाना ) , दत्तात्रय आंबेकर ( सराई) अजिनाथ नागे( सराई ) , सुभाष नागे( सराई) , ताजुभाई बेग  (ममनापूर)यांना अपघात ग्रस्त व्यक्तींना कशा पद्धतीने मदत करायची ? त्यांना कशा पद्धतीने हाताळायचे? गोल्डन अवर मध्ये कशा प्रकारे मदत करायची याविषयी प्रात्यक्षिके दाखवून मार्गदर्शन केले.तसेच ” हायवे मृत्युंजय दूत” यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे . प्रत्येक मृत्युंजय दूत यांना राष्ट्रीय व राज्य महामार्गा वरील हॉस्पीटल, अंबुलन्स  यांचे संपर्क क्रमांक देण्यात आले.  तसेच स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात विमा याेजना  संदर्भात माहीती देण्यात येऊन  फस्टऍड किट वाटप करण्यात आले आहे. यावेळी महामार्ग साहयक पोलिस निरीक्षक सुरेश भाले , ए एस आय विश्वास पडुल ,पोलिस हवलंदार बाबुराव जाधव, सईद जाफर,अभिजित गायकवाड, सागर पाटील,अमर अलंजकर, पोलीस मित्र  शांताराम सोनवणे यांच्या सह मृत्युंजय दुत यांची  उपस्थिती होती         

Show More

mh20live

आपल्या हक्काचे लोकप्रिय रोखठोक डिजिटल व्यासपीठ MH20LIve 🎥🖋️ mh20live चॅनल आपल्या हक्काचे चॅनल आपल्या भागातील ताज्या घडामोडी,संस्कृती, मनोरंजन व क्राइम बातम्या बघण्यासाठी www.mh20live.com आमच्या चॅनललाsubscribe करून घंटी समोरील बटन दाबा. mh20live Network अल्पावधीतच प्रसिद्धी मिळत असून महाराष्ट्रभर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे.संर्पक [email protected] MH20Live हे न्यूज पोर्टल mh20live Network Group यांनी प्रसारित केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे. औरंगाबाद न्याय कक्ष)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close